Beed News Pritam Munde Saam tv
ऍग्रो वन

Pritam Munde: शेतकऱ्यांना सरकारने न्याय द्यावा, सरसकट भरपाई मिळावी; खासदार प्रीतम मुंडेंची सरकारकडे मागणी

शेतकऱ्यांना सरकारने न्याय द्यावा, सरसकट भरपाई मिळावी; खासदार प्रीतम मुंडेंची सरकारकडे मागणी

विनोद जिरे

बीड : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पिकं उद्धवस्त झाले आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. दिवाळी तोंडावर आहे. त्यामुळे सरकारने आता (Beed) बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा. पंचनाम्यात वेळ न घालवता, आता सरसकट नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी केली. (Maharashtra News)

बीडच्या आष्टी (ashti) तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतपिकांची पाहणी दौऱ्यादरम्यान माध्‍यमांशी संवाद साधताना त्‍या बोलत होत्या. आष्टी तालुक्यातील पांढरी, सोलेवाडी यासह अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने (Rain) थैमान घातल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याच नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावर आज खासदार प्रीतम मुंडे गेल्या आहेत. त्यांनी हतबल झालेल्या शेतकऱ्यांसोबत सवांद साधला. यावेळी (BJP) भाजप नेते माजी आमदार भीमराव धोंडे, तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, (Farmer) शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.

धीर सोडू नका

अतिवृष्‍टीमुळे झालेल्‍या नुकसानीच्‍या पाहणी दरम्‍यान नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांशी खासदार मुंडे यांनी संवाद साधत त्‍यांना धीर दिला. आम्ही सोबत आहोत, धीर सोडू नका. दिवाळीपूर्वी मदत मिळावी; यासाठी आम्ही सर्वोत्तपरी प्रयत्न करत असल्‍याचे यावेळी खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Maharashtra News Live Updates: ही तर गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंची टीका

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाका, मी काय ऐरागैरा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नेम

Assembly Election: पक्षाने अजित पवारांना तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं, आता युगेंद्र; सांगता सभेत शरद पवारांचे आवाहन

SCROLL FOR NEXT