Insurance Company
Insurance Company Saam tv
ऍग्रो वन

Beed News: विमा कंपनी उठली शेतकऱ्यांच्या मुळावर; बारा हजार शेतकऱ्यांची खाती अद्याप गोठलेली

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात बजाज विमा कंपनी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे पाहायला मिळत आहे. चूक कंपनीची (Insurance Company) असतांना नाहक त्रास मात्र शेतकऱ्यांना (farmer) दिला जातोय. शेतकऱ्यांच्या खात्यावर साडेबारा कोटी रुपये जमा झाल्यानंतर कंपनीने जवळपास १२ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांची खाती गोठवली आहेत. (Live Marathi News)

बजाज अलियान्झ कंपनीने चुकून अतिरिक्त १२ कोटी ३५ लाख १३ हजार ३५८ रुपयांची रक्कम १२ हजार ८८३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केल्याचा दावा केला आहे. पैसे जमा झालेल्या खासगी, सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांमधील शेतकऱ्यांची बँक खाती कंपनीच्या सुचनेनुसार गेल्या महिनाभरापासून गोठवण्यात आली आहेत.

शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प

जवळपास गेल्या १ महिन्यांपासून अनेक शेतकऱ्यांचे खाते गोठवले गेले आहेत. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. दरम्यान ही कंपनीची चूक असताना त्याचा त्रास मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना ऐन कामाच्या वेळेला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

12 th HSC Result News : 12वी विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, 1 वाजता निकाल होणार जाहीर!

Today's Marathi News Live : पुणे अपघात प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन, कठोर कारवाईच्या सूचना

Kashmiri Kahwa: फेमस आणि काश्मिरी स्पेशल कहवा चहा; कसा बनवतात? रेसिपी पाहा

Unseasonal Rain : अकोल्यात अवकाळीसह गारपीट; केळी पिकांचे मोठे नुकसान

Ashvini Mahangade : नानांच्या एका सल्ल्याने आश्विनी महांगडेचं कसं आयुष्य बदललं? पोस्ट शेअर करत सांगितला किस्सा

SCROLL FOR NEXT