Beed Heavy Rain Saam tv
ऍग्रो वन

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Beed News : राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस होत आहे. सततचा पडणारा पाऊस आता नकोस झाला आहे. परतीचा मानला जात असलेला हा पाऊस नुकसानकारक ठरत आहे.

विनोद जिरे

बीड : राज्यात परतीचा पाऊस जोरदार होत आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याच दरम्यान बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील हिटचा प्रभाव कमी झाला. मात्र अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केले आहे.

राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस (Heavy Rain) होत आहे. सततचा पडणारा पाऊस आता नकोस झाला आहे. परतीचा मानला जात असलेला हा पाऊस नुकसानकारक ठरत आहे. कापूस, सोयाबीन, कांद्याचे मोठे नुकसान या पावसामुळे होत आहे. दरम्यान (Beed) बीड जिल्ह्यात देखील आज पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेला कांदा खराब झाला आहे. अश्रुबा कोळपे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती. हा कांदा काढणीला आला होता. मात्र झालेल्या पावसाने कांद्याचे पीक अक्षरशः पाण्यात तरंगताना दिसून येत आहे.

पीक विमा मिळण्याची अपेक्षा 
बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरातील शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या कांदा पिकाचं मोठं नुकसान झाले आहे. अक्षरशः कांद्याचे पीक पाण्यावर तरंगताना दिसून येत आहे. क्रॉप इन्शुरन्स ॲपवर याची तक्रार नोंदविणे गरजेचे आहे. मात्र शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT