Beed Lightning Strike Saam tv
ऍग्रो वन

Lightning Strike: अवकाळीने घेतला शेतकऱ्याचा बळी; पाली गावात वीज पडून मृत्यू

Beed News : पावसाचे वातावरण निर्माण होऊन विजांचा कडकडाट झाला आणि वीज कोसळली

Rajesh Sonwane

बीड : राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्याचा बळी घेतल्याची घटना (Beed) बीड जिल्ह्यात समोर आली आहे. पाली गावात जनावरे सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर वीज (Lightning Strike) पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. आत्माराम निवृत्ती राऊत असं मयत शेतकऱ्याचे नाव आहे. (Live Marathi News)

मयत शेतकरी आत्माराम राऊत हे आपल्या शेतामध्ये जनावरे चारत होते. या दरम्यान पावसाचे वातावरण निर्माण होऊन विजांचा कडकडाट झाला आणि वीज कोसळली. त्यामध्ये शेतामध्ये असलेल्या आत्माराम राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकसान भरपाई मिळावी 

दरम्यान बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली आहे. यात शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला रब्बीचा घास वाया गेला आहे. ज्वारी भुईसपाट झाली, तर कापसाच्या वाती झाल्यात. त्याचबरोबर कांदा, हरभरा याचं देखील मोठं नुकसान झाले आहे. यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Shukra Yuti 2025: 18 वर्षांनी शुक्र-मंगळ दुर्मिळ संयोग; दिवाळीपूर्वीच 'या' राशींना लागणार लॉटरी

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Donald Trump : मोदींचं आश्वासन! भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

SCROLL FOR NEXT