Beed News
Beed News Saam tv
ऍग्रो वन

Beed News: कांद्याला भाव नाही, कर्ज फेडीच्‍या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

विनोद जिरे

बीड : कांद्याला भाव नाही.. त्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे? घरात विधवा बहीण, वृद्ध आई- वडील, बहिणीचे लहान मुलं यांचा सांभाळ कसा करायचा? कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा? या एक ना अनेक संकटात गुरफटलेल्या (Beed) बीडच्या बोरखेड येथील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. संभाजी अर्जुन अष्टेकर (वय २५) असं आत्महत्या केलेल्या कांदा उत्पादक (farmer) शेतकऱ्याचे नाव आहे. (Breaking Marathi News)

बोरखेडे (जि. बीड) येथील शेतकरी संभाजीकडे केवळ ५ एकर शेती आहे. त्याच्याकडे खाजगी सावकाराचे साडेतीन लाखाचे कर्ज आहे. तो शेतात पिकवलेल्या कांद्यातून आपले कर्ज फेडणार होता. मात्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कांद्याला भाव मिळाला नाही. यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे? असा प्रश्न त्याच्यापुढे होता. त्याचबरोबर (Onion) त्याच्यावर विधवा बहिण, तिचे मुलं, वृद्ध आई- वडील यांची जबाबदारी होती. यामुळे कुटुंब कसं चालवावं? असा देखील प्रश्न त्याच्यापुढे होता. या विवचनेतूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचलले.

आत्‍महत्‍या नसून सरकारने केलेला खून आहे : डॉ. ढवळे

संभाजी याने शेतीसाठी आणि बहिणीसाठी कर्ज घेतलं होतं. या कांद्याच्‍या उत्‍पादनातून त्याला कर्ज फेडायचं होतं. मात्र या कर्जामुळे संभाजीने टोकाचे पाऊल उचलले असे नातेवाईकांनी म्हटले आहे. मात्र संभाजी अष्टेकर याने आत्महत्या केली नसून सरकारने केलेला हा खून आहे; असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी केला आहे. त्यामुळे संभाजी हा कुटुंबातील कर्ता पुरुष होता. त्याच्या जाण्यामुळे आता कुटुंब उघड्यावर येणार आहे. त्यामुळे सरकारनं आता या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी आणि या अष्टेकर कुटुंबाला न्याय द्यावा. अशी मागणीही केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संभाजीराजे छत्रपती अभ्यासू, त्यांच्याकडून असं अपेक्षित नव्हतं : चंद्रकांत पाटील, Video

Prasadacha Sheera : मऊ लुसलुशीत आणि गोड प्रसादाचा शिरा रेसिपी

PM Narendra Modi Rally: शहजादेला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा, पीएम मोदींचा राहुल गांधींवर पुन्हा निशाणा

Dubai Rain Alert : दुबईवर जलप्रलयाचं संकट! मुसळधार पावसाच्या शक्यतेने फ्लाईट्स रद्द, शाळा बंद

Today's Marathi News Live : अहमदनगर जिल्ह्यात खासगी बसला भीषण आग

SCROLL FOR NEXT