Women's Day: बस्स नाम काफी है! रणरागिणी गीतांजली कोळींचा दबदबा, धुळ्यातील बहुतांश गावांमध्ये झाली दारूबंदी!

बस्स नाम काफी है! रणरागिणी गीतांजली कोळींचा दबदबा, धुळ्यातील बहुतांश गावांमध्ये झाली दारूबंदी!
Dhule News Women's Day
Dhule News Women's DaySaam tv
Published On

धुळे : महिलांच्या जीवनातील सर्वात त्रासदायक ठरणारा विषय म्हणजे दारू. दारूमुळे महिलांच्या संसाराची अक्षरशः राख रांगोळी (Dhule News) होत असल्याने धुळ्यातील सर्वसामान्य गृहिणी असलेल्या गीतांजली कोळी या आदिवासी महिलेने महिलांच्या जीवनातील ही व्यथा दूर करण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून दारूबंदीचा (Liquor Ban) लढा सुरू केला आहे. या लढ्यातून जिल्‍ह्यातील बहुतांश गावांमध्‍ये दारूबंदी झाली आहे. (Breaking Marathi News)

धुळे जिल्‍ह्यातील २५० हून अधिक गावांमध्ये गितांजली कोळी या महिला रणरागिनीने दारूबंदीचा लढा सुरू ठेवला आहे. या रणरागिणीच्या धाकाने अवैधपने दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. जागतिक महिला दिनाच्या (Womens Day) निमित्ताने महिलांच्या जीवनातील व्यथा खऱ्या अर्थाने दूर करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या या आदिवासी महिला रणरागिणीला साम टीव्हीचा सलाम.

Dhule News Women's Day
Accident News: अतिवेगाने दुचाकीवरील नियंत्रण सुटले; उड्डाणपुलावरुन पडून मृत्यू

‘गीतांजली’ नावानेच व्‍यवसाय केले बंद

या माध्यमातून गीतांजली कोळी यांनी पदरमोड करून गावोगावी पोहोचून गावातील महिलांना एकत्र करतात. त्या गावात दारूबंदी करण्यासाठी लढा हळूहळू सुरू केला. या लढ्याची ठिणगी हळूहळू संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरू लागली. जिल्हाभरात गीतांजली कोळी या रणरागिणीच्या नावाने अवैध दारू व्यवसाय चालवणाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकू लागली आहे. बहुतेक अवैध दारू व्यवसाय चालवणाऱ्यांनी गीतांजली कोळी यांच्या धाकाने आपला व्यवसाय बंद देखील केला आहे.

अन्‌ महिला मदतीसाठी करतात फोन

ज्या गावातून महिलांना अवैध दारूच्या अड्ड्यांमुळे त्रास होतो. त्या महिला गीतांजली कोळी यांना फोन करून गावातील दारूचे अड्डे बंद करण्यासंदर्भात मदत मागतात. त्यावेळी गीतांजली कोळी या आपल्या साथीदार महिला रणरागिणींच्या मदतीने गावात पोहोचून त्या गावातील अवैध दारूचे दुकान पूर्णपणे उध्वस्त करतात. विशेष म्हणजे या कामात राज्य उत्पादन शुल्क विभागाची देखील चांगल्या प्रकारे मदत या महिला रणरागिणींना होत असते.

उध्वस्त झालेले संसार फुलले

आतापर्यंत गीतांजली कोळी यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये संपूर्णतः दारूबंदी झाली असून या गावांमध्ये पुन्हा एकदा दारूमुळे उध्वस्त झालेले संसार चांगल्या प्रकारे फुलू लागले आहेत. जोपर्यंत जिल्‍ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दारूबंदी होणार नाही, तोपर्यंत आपला लढा असाच अहोरात्र सुरू ठेवणार असल्याचा निर्धार गीतांजली कोळी या महिला रणरागिनीने केला आहे. या लढ्याला त्यांच्या सोबत असलेल्या महिला रागिनींचा या कामात चांगल सहकार्य लाभत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com