Beed News Saam tv
ऍग्रो वन

Beed News : साडेतीन महिन्यात ५४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; कर्जबाजारीपणाचे ठरतेय मुख्य कारण

Beed News : शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला हमीभाव दिला गेला पाहिजे. आजघडीला कापूस, सोयाबीन कवडीमोल भावात विकले जात आहेत.

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा हळूहळू कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी ते मार्च महिन्याच्या कालावधीत आत्महत्येचा आकडा कमी झाला आहे. अर्थात (Farmer) शेतकरी आत्महत्येचा आकडा कमी होत असला तरी आत्महत्येचे सत्र मात्र सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जसं फॅशनच्या युगामध्ये सर्व वस्तूंचे, गाड्यांचे भाव वाढत आहेत. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला हमीभाव दिला गेला पाहिजे. आजघडीला (Cotton) कापूस, सोयाबीन कवडीमोल भावात विकले (Beed) जात आहेत. त्यामुळे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असं संकट शेतकऱ्यांकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. त्यामुळे आमच्या मालाला हमीभाव द्या; अशीच मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कर्जबाजारीपणा ठरतेय मुख्य कारण 

अवकाळी पाऊस, (Rain) गारपीट यात पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान, त्यात शेती मालाला भाव नाही. यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे कसे?, वाढती महागाई यामुळं हतबल झालेला शेतकरी टोकाचं पाऊल उचलत आहे. गतवर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च २०१३ पर्यंतच्या ९० दिवसांमध्ये ६५ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. तर यंदा १ जानेवारी ते १५ एप्रिल २०२४ पर्यंतच्या १०५ दिवसांमध्ये ५४ शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद शासन दरबारी करण्यात आली आहे. कर्जबाजारीपणामुळे नैराश्येत जावून आत्महत्या करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT