Baramati News Saam tv
ऍग्रो वन

Baramati News : पावसाने फिरवली पाठ; पेरूच्या उत्पादनावरही परिणाम

पावसाने फिरवली पाठ; पेरूच्या उत्पादनावरही परिणाम

मंगेश कचरे

बारामती : महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांची देखील चिंता वाढली आहे. यात बारामती (Baramati) तालुक्यातील डोर्लेवाडी येथील युवा शेतकरी (Farmer) राहुल चव्हाण यांनी चार एकरावर पेरूची बाग लावली होती. याचे देखील नुकसान होत आहे. (Tajya Batmya)

पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. कापसासह सोयाबीन, उडीद, मूगाचे अधिक नुकसान झाले आहे. एन बाहेर येण्याच्या वेळेस पाऊस नसल्याने उत्पन्न घाले आहे. परंतु आता फळ बागांनाही याचा फटका बसलेला पाहावयास मिळत आहे. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील शेतकरी रवींद्र चव्हाण यांच्या बागेला याचा फटका बसला आहे. मुरमाड जमिनीवर चव्हाण यांनी पेरुचे नंदनवन फुलवले आहे. यंदाच्या वर्षी चव्हाण यांना पेरुतून चांगले उत्पादन मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पावसाने पाठ फिरवली उत्पादनही घटले आणि पेरुचे दर देखील कमी झाले. त्यामुळे चव्हाण यांचे दुहेरी नुकसान झालं आहे.. चव्हाण यांच्या प्रमाणे अनेक शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे.

५ लाखांपर्यंत तोटा 
यापूर्वी चव्हाण हे पारंपारिक शेती करत होते. त्यानंतर ते फळबागाकडे वळाले त्यांनी सुरुवातीला डाळिंब या पिकाची बाग लावले. मात्र तेल्या आणि मर रोगाने डाळिंब हे पीक त्यांचे वाया गेल्याने त्यांनी डाळिंबाचे संपूर्ण पीक उपटून टाकले. यानंतर पेरूची लागवड केली. यामध्ये १८०० रोपे व्हिएनआर तर १२०० रोपे तैवान पिंकची लावली. पेरूची बाग लावल्यानंतर दीड वर्षानंतर उत्पादनाला सुरुवात झाली. पहिल्याच वर्षी व्हीएनआर मधून १५ टन उत्पादन तर तैवानमधून बारा टन पेरूचे उत्पादन घेतले. पहिल्या वर्षी चव्हाण यांना खर्च वजा जाता सात ते आठ लाख रुपयांचा नफा मिळाला. दुसऱ्या वर्षी व्हीएनआर ३० टन तर तैवांचा मधून २० टन पेरूचे उत्पादन मिळाले. त्यातून त्यांना १२ लाख रुपयांचे निव्वळ नफा मिळाला. मात्र यावर्षी पावसाने पाठ फिरवली आहे चव्हाण यांना ६० ते ७० टन उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र आता फक्त ४० टन उत्पादन मिळणार आहे. कमी उत्पादन मिळाल्यानं 4 ते 5 लाखांचा तोटा होणार असल्याचे चव्हाण सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT