सफरचंदाची शेती इंदापूरात; खरात कुटुंबाचा यशस्वी प्रयोग... Saam Tv
ऍग्रो वन

सफरचंदाची शेती इंदापूरात; खरात कुटुंबाचा यशस्वी प्रयोग...

काश्मीर व्यतिरिक्त इतर ठिकाणी सफरचंदाची लागवड कशी करावी याच मार्गदर्शन खरात करत आहेत.

मंगेश कचरे

बारामती -  इंदापूर Indapur तालुक्यातील सणसर गावच्या प्रभाकर खरात Prabhakar Kharat यांनी इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे खर करुन दाखवलं आहे. सफरचंदाची शेती करून खरात यांनी यशस्वी रित्या उत्पादन घेतले आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर व्यतिरिक्त इतर ठिकाणी सफरचंदाची लागवड कशी करावी याच मार्गदर्शन खरात करत आहेत.

मुळचे  प्रभाकर खरात हे एक शिक्षक आहे. मात्र सेवा निवृत्त झाल्यापासून ते शेती करतात. शेती करत असताना एक वेगळा प्रयोग करायचा खरात  यांनी सफरचंदाची लागवड करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी दार्जिलिंगमधून सफरचंदाची रोपे मागवली. या रोपांची लागवड करुन अवघ्या १५ ते १९ महिन्यात त्यांनी सफरचंदाचे पहीले उत्पादन यशस्वीपणे काढले. यामुळे परिसरात सफरचंदाची शेती चांगलीच चर्चेत आली‌‌ आहे.

हे देखील पहा -

प्रभाकर खरात यांचचा धाकटा मुलगा ही त्यांना शेतीत मदत करतो.सफरचंदाचा १० गुठ्यांतील यशस्वी प्रयोग केल्यानंतर त्यांनी सिडलेस लिंबू, बदाम याशिवाय मसाल्याच्या पदार्थासह एकूण २० ते २५ प्रकारची वेगवेगळी उत्पादने यशस्वी पणे घेतली आहे. याशिवाय ऊस उत्पादन किंवा नेहमीच्या पिकांपेक्षा सफरचंद, सिडलेस लिंबू बदाम यातून अधिकचा नफाही त्यांना मिळतो आहे.

योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केले तर शेतीत कसा नफा होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे खरात कुटुंब. यशस्वी प्रयोगानंतर ते इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करत आहेत. जम्मू-काश्मीर सोडून इतर ठिकाणी सफरचंदाची शेती करता येते. याचा उत्तम प्रयोग इंदापूर तालुक्यातल्या खरात यांनी करुन दाखवले आहे.खरात यांनी आपल्या गावाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT