आता लहान मुलांनाही मिळणार मॉलमध्ये प्रवेश; सुधारित नियमावली जाहीर

१८ वर्षांखालील मुलांना शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश मिळणार
आता लहान मुलांनाही मिळणार मॉलमध्ये प्रवेश; सुधारित नियमावली जाहीर
आता लहान मुलांनाही मिळणार मॉलमध्ये प्रवेश; सुधारित नियमावली जाहीरSaam Tv
Published On

मुंबई - राज्यात ब्रेक द चेन Break The Chain अंतर्गत नवे आदेश लागू करण्यात आले आहेत. यात कोरोनावरील Corona लसचे Vaccine दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत. मात्र असे असले तरी आता १८ वर्षांखालील मुलांना शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे.

१८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. त्यामुळे या मुलींना मॉलमध्ये प्रवेश देताना वयाचा पुरावा म्हणून आपले ओळखपत्र दाखवणे आवश्यक असल्याचे सुधारित आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

कोरोना परिस्थिती आता आटोक्या आल्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामध्ये मॉल्स आणि हॉटेल रात्री १० वाजेपर्यं सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र मॉलमध्ये प्रवेश करणाऱ्यांवर निर्बंध लावण्यात आले असून ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे.

११ ऑगस्ट रोजी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध शिथिल केले. राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या आदेशात मॉल रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी आहे.

आता लहान मुलांनाही मिळणार मॉलमध्ये प्रवेश; सुधारित नियमावली जाहीर
गुलाबी थंडी, आल्हाददायक वातावरणाची पर्यटक लुटताहेत मजा

मात्र, मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व्यांचे आणि मॉलमध्ये जाणाऱ्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन डोस पूर्ण व दुसरी डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहिल. आता राज्य सुधारित आदेशानुसार १८ वर्षाखालील मुलांना देखील मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे. मात्र १८ वर्षाखालील मुलांना आपले ओळखपत्र दाखवणे आवश्यक असल्याचे सुधारित आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com