Junnar Agriculture News:
Junnar Agriculture News: Saam TV
ऍग्रो वन

अज्ञाताने दीड एकरातील कलिंगड कोयत्याने कापले; बळीराजा ढसाढसा रडला

रोहिदास गाडगे

जुन्नर : रात्रंदिवस काबाड कष्ट करुन जोमात आलेलं शेतातील उभं पीक, हे शेतकऱ्यासाठी किती महत्वाचं असतं हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. मग त्याचा मोबदला मिळण्याअगोदरच कुणी त्यावर हात साफ केला, तर त्याचा शेतकऱ्याच्या मनावर काय परिणाम होत असेल, ही व्यथा त्या शेतकऱ्यालाच ठाऊक. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीत अशीच एक घटना घडली आहे. दत्तात्रय काकडे या शेतकऱ्याच्या तब्बल दीड एकर कलिंगडाच्या शेतीचे अज्ञात व्यक्तीने नुकसान केले आहे.

सध्याच्या उन्हाच्या कडाक्यात कलिंगडाला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी आनंदात आहे. अशातच दीड एकर शेतातील तोडणीला आलेल्या कलिंगडच्या पीकाचं अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा करत नुकसान केलं. या अज्ञात व्यक्तीने शेतातील कलिंगडे कोयत्याने तर फोडलीच, शिवाय कलिंगडाचे वेलही कापून टाकले. त्यामुळे ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने दत्तात्रय काकडे यांना अश्रू अनावर झाले.

कलिंगडाला चांगला बाजारभाव मिळुन दोन पैसे हातात येतील, या आशेने पिंपळवंडीतील काकडे कुटुंब दिवसरात्र एक करुन कलिंगडाचे संगोपन करत होते. त्यांच्या कष्टाला यशही मिळालं होतं. पण, कलिंगड तोडणीला १५ दिवसाचा कालावधी असताना बुधवारी रात्री अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा करत संपूर्ण कलिंगड शेतीचे नुकसान केलं. दरम्यान, हा खोडसाळपणा नेमका कुणी व कशासाठी केला हे अद्यापही समजू शकलं नाही. मात्र या खोडसाळपणाने दत्तात्रय काकडे यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi in Solapur : स्वत: बाबासाहेब आंबेडकर आरक्षण संपवू शकत नाही, मग मोदींचा प्रश्नच नाही; पंतप्रधानांचा हल्लाबोल

Ravindra Dhangekar On PM Modi: पुणेकरांचा पैसा प्रचारासाठी वापरला, आचारसंहिता भंग केला; मोदींच्या सभेवर रविंद्र धंगेकरांचा आक्षेप

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवाल का? तानाजी सावंतांच्या टीकेवर ओमराजेंचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान

Maharashtra Din 2024 : जय जय महाराष्ट्र माझा... १ मे ला महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

Jalana News: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग! गावकरी, पोलीस घटनास्थळी दाखल; जालन्यात काय घडलं?

SCROLL FOR NEXT