वीजबिल थकबाकी; पालिकेच्या सहा बोअरवेलचे कनेक्शन कट

वीजबिल थकबाकी; पालिकेच्या सहा बोअरवेलचे कनेक्शन कट
MSEDCL
MSEDCLSaam tv

तळोदा (नंदुरबार) : नगरपालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या बोरवेलचे वीज बिल थकल्यामुळे वीज वितरण कंपनीने (MSEDCL) कारवाई करत पालिकेच्या सहा बोरवेलचे वीज कनेक्शन कट केले. ऐन उन्हाळ्यात बोअरवेलचा वीज पुरवठा खंडित केल्याने रहिवाशांना पाणीबाणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. (nandurbar news Electricity bill arrears Connection cut of six borewells of the taloda municipality)

MSEDCL
संतप्त महिला धडकल्‍या पोलिस अधिक्षक कार्यालयावर!

तळोदा (Taloda) पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे वीज वितरण कंपनीची जवळपास ६५ लाख रुपयांची थकबाकी असून या बाबतीत मार्च महिन्यात विद्युत वितरण कंपनीकडून पालिकेला नोटीस देऊन याबाबत कळविले होते. शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या दत्त कॉलनी, भोई गल्ली, कुंभार गल्ली, गढी परिसर इत्यादींसह एकूण सहा पाणी पुरवठा करणाऱ्या कुपनलिकांचा विद्युत पुरवठा खंडित केला. दरम्यान सकाळपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता (Nandurbar News) भासून हाल झाले. यातील मुस्लिमबहुल भागात पाण्यासाठी जास्त हाल झालेली दिसून आले. रमजानचा महिना असल्यानें स्थानिक रहिवाशांकडून यामुळे संताप व्यक्त करण्यात येत होता.

पालिकेचे उत्‍पन्‍न कमी

दरम्यान तळोदा पालिकेचे उत्पन्न कमी असून नागरिकांकडे पाणीपट्टी, घरपट्टी व इतर कर बाकी असून पालिका वसुली करण्यात कमी पडल्याचे बोलले जात आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांचे प्रचंड हाल होत असतात या बाबींकडे पालिकेने लक्ष द्यावे अशी मागणी शहरवासीयाकडून करण्यात आली आहे. ज्या प्रभागात नगरसेवक वजनदार आहेत. त्या भागातील मोटरचे कनेक्शन कट करण्यात येत नाही. ज्या भागात कोणीच लक्ष देत नाही असे असे गरीब बहुल वस्तीतील मोटारींचे कनेक्शन नेहमी कट करण्यात येत असून बाबींकडे संबंधित नगरसेवक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या भागातील नागरिक करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com