संतप्त महिला धडकल्‍या पोलिस अधिक्षक कार्यालयावर!

संतप्त महिला धडकल्‍या पोलिस अधिक्षक कार्यालयावर!
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : दलित समाजाविषयी व समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह फोनवरून संभाषण करणाऱ्या समाजकंटकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी संतप्त महिलांनी पोलीस (Police) अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. (Dhule news Angry woman morcha up Superintendent of Police office)

भीमनगर महिला मंडळाच्यावतीने आज धुळे (Dhule) पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान मोठ्या संख्येने भीमनगर येथील महिला सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले. या महिलांनी पोलीस अधीक्षकांना या संदर्भातील निवेदन दिले. या समाज कंटकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी व यानंतर कुणीही दलित समाजाच्या महिलांवर अक्षपार्य विधान करणार नाही याची काळजी देखील पोलिस प्रशासनातर्फे घेण्यात यावी, अशा पद्धतीने कठोरात कठोर शासन करण्याची मागणी या संतप्त महिलांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com