Unseasonal Rain Saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain : अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका; अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात ९ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका आहे. या (Rain) दोन्ही जिल्ह्यात मिळून ९ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे. अमरावती (Amravati) विभागीय आयुक्त कार्यालयाचा तसा प्राथमिक अहवाल देखील समोर आला आहे. (Latest Marathi News)

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पश्चिम विदर्भात १० आणि ११ फेब्रुवारी रोजी गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. या अवकाळीमुळे पिकांचे नुकसान झाले असून अवकाळी पावसामुळे खरिपातील तूर तसेच रब्बीतील गहू, हरभरा, भाजीपाला आणि फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे पुन्हा एकदा (Farmer) शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस झाल्यानंतर महसूल आणि कृषी विभागाच्या पथकाकडून बाधित क्षेत्राची पाहणी करण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विभागीय आयुक्तांना अहवाल प्राप्त 
यानंतर विभागातील पाचही जिल्हाधिकारी मार्फत अमरावती विभागीय आयुक्तांना प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील दरेगाव दशासर येथे १० फेब्रुवारीला झालेल्या गारपीटत २८१५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. तर यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यातील २४९४ हेक्टर, कळब तालुक्यात ५५ हेक्टर, आणि उमरखेड तालुक्यात ३४३५ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT