Amravati Rain
Amravati Rain Saam tv
ऍग्रो वन

Amravati Rain : दहा दिवसांपासून पावसाची दडी; सोयाबीन पिकावर परिणाम

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: पावसाने सुरवातीला दमदार हजेरी लावली. यानंतर मात्र पावसाने अनेक भागात दडी मारल्याचे चित्र आहे. अमरावती जिल्ह्यात देखील मागील दहा दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतात पेरणी केलेल्या शेतकऱ्याचा जीव टांगणीला आला असून जमिनीतून निघत असलेल्या सोयाबीन पिकावर परिणाम होत आहे. येत्या काही दिवसात पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. 

राज्यात यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या. मान्सून लवकर आल्याने यंदा पीक जोमाने येईल अशी आशा आहे. त्या अनुषंगाने सुरवातीला पडलेल्या दमदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या करून टाकल्या आहेत. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली आहे. भर पावसाळ्यात उन्हाळ्या सारखे ऊन तापत असल्याने जमिनीतून निघालेले (Soyabean Crop)  सोयाबीनचे कोंब मरू लागले आहेत. यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात घाट होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय बळीराजाचे (Farmer) देखील आर्थिक नुकसान होत असून दुबार पेरणीचे संकट देखील उभे आहे. 

अद्याप ५५ टक्के पेरणी बाकी 

विदर्भातील १७ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची पेरणी करण्यात येणार आहे. परंतु पाऊस नसल्याने सोयाबीनचे पीक जळू लागले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान सुरवातीला झालेल्या पावसानंतर (Amravati) अमरावती जिल्ह्यात केवळ ४५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दमदार पाऊस नसल्याने अमरावती जिल्ह्यात ५५ टक्के पेरणी बाकी आहे. यामुळे शेतकरी आता चांगल्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Relationship Tips : बायको रुसून माहेरी गेली? या टिप्सने स्वत: धावतपळत घरी येईल

Marathi Live News Updates: वरळी हिट अँड रन प्रकरण; राजेश शहा यांनी जामिनासाठी केला अर्ज

Mumbai Rain VIDEO: सर्वसामान्यांसोबतच आता मंत्र्यांनादेखील मुसळधार पावसाचा तडाखा

Wagh Nakh Video: लंडनमध्ये नाही, शिवरायांची वाघनखं साताऱ्यातच; इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांचा दावा

Mumbai Malad Subway News: मालाडच्या सबवेत पाण्याखाली अडकली कार, Viral Video

SCROLL FOR NEXT