Akola News: Unseasonal Rain Again In Akola; Orchards Were Destroyed Saam TV
ऍग्रो वन

Akola Weather News: अकोल्यात पुन्हा अवकाळी; फळबागा झाल्या उध्वस्त

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : राज्यात सध्या अवकाळी पाऊस सुरु आहे. यात अकोल्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. (Akola) अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यात आज सकाळी अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा (Rain) फटका बसला आहे. यामुळे पिकांचे नुकसान झाले असून नागरिकांची तारांबळ उडाली.

हवामान विभागाने राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार मागील तीन- चार दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. यात अकोला जिल्ह्यात झालेल्या वादळाने तेल्हारा (Telhara) तालुक्याला आधीच मोठा फटका बसला होता. यानंतर आज सकाळी पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला असून शेतात असलेल्या फळबागांना याचा मोठा फटका बसला आहे.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात सकाळी तब्बल ३० मिनिट पाऊस बरसला. सोबत विजेचा कडकडाट सुद्धा सुरू होता. तालुक्यातील हिवरखेड सह कार्ला यासह अनेक गावांना वादळी वाऱ्याचा फटका बसला होता. केळी, पपई यासह अन्य फळबागा  भुईसपाट झाल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT