Farmer Success Story Saam tv
ऍग्रो वन

Farmer Success Story : काश्मीरची चव आता अकोल्याच्या मातीत; 'हॉट सिटी'त सफरचंद लागवड

Akola News : शेतात नवनवे आणि भन्नाट प्रयोग करण्यासाठी नवनीत चांडक कायम चर्चेत असतात. त्यांनी शेतात सफरचंद लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी एक एकर सफरचंद लागवडसाठी खुले ठेवले

Rajesh Sonwane

अक्षय गवळी

अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या ऐदलापूर गावातल्या नवनीत चांडक या शेतकऱ्याने धाडसी प्रयोग केला आहे. चांडक यांनी एका एकरात तब्बल ७०० सफरचंदाची झाडे लावली आहेत. हिमाचल प्रदेश अथवा जम्मू काश्मीर सारख्या थंड हवामानात घेतल्या जाणारे सफरचंद पिक आता अकोल्यासारख्या उष्ण शहरात घेतले जात आहे. 

शेतात नवनवे आणि भन्नाट प्रयोग करण्यासाठी नवनीत चांडक कायम चर्चेत असतात. त्यांनी शेतात सफरचंद लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी एक एकर सफरचंद लागवडसाठी खुले ठेवले. मोबाईल आणि युट्युबच्या माध्यमातून चांडक यांनी शेतात सफरचंद लागवडीबद्दल माहिती घेतली. यानंतर त्यांनी डिसेंबर २०२२ मध्ये सफरचंद लागवड केली. विशेष म्हणजे आता नवनीत चांडक यांच्या शेतातल्या सफरचंदला फळ देखील लागले आहेत. येत्या दिड ते दोन महिन्यात सफरचंद पीक त्यांच्या हाती येणार आहे. 

हिमाचल प्रदेशातून मागविली रोपे
महाराष्ट्रातल्या सोलापूर, सांगली, अहमदनगर इथल्या काही शेतकऱ्यांनी सफरचंद शेतीची लागवड केली आहे. त्यांच्या संपर्कात नवनीत चांडक आहेत. तर युट्युबवरून हिमाचल प्रदेशातील सफरचंद उत्पादक शेतकरी शर्मा यांच्याशी झाला. त्यांनी डिसेंबर २०२२ मध्ये सफरचंद रोप प्रत्येकी १३० रुपये प्रतिदराने जवळपास ७०० रोपे त्यांनी मागविले. ९१ हजार रुपयांचे ही रोपे झाली होती. डोर्सेट गोल्ड आणि अन्ना सफरचंद प्रजातीची ही रोपे आहेत. 

सफरचंदाचे लागले घस 
शेतातील ४० गुंठे क्षेत्रात सफरचंदाची ७०० रोपे लावली. आठ ते दहा फुटांवर प्रत्येक झाडांचे अंतर असून लागवडसाठी प्रत्येक रोपमागे सहा रुपये इतका खर्च त्यांना आला. लागवडीला दोन वर्षाच्या वरचा कालावधी झाला असून झाडांची वाढ चांगली झाली आहे. अंदाजे ५ फूट एवढी या झाडांची उंची झाली आहे. तर काही झाडांची उंची सात फुटापर्यंत गेली. विशेष म्हणजे संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने हि शेती करत आहेत. त्यामुळं प्रत्येकी झाडाला दहा ते बारा किलो इतके सफरचंद मिळणार असल्याच नवनीत चांडक म्हटले. अर्थातच सद्यस्थितीत चांडक यांच्या सफरचंद झाडाला प्रत्येकी २० ते २५ फळ लागले आहेत. 

यशस्वी प्रयोगाने आणखी एक शेतकऱ्याची लागवड 
तर चांडक यांचे मित्र श्रीकृष्ण सावरकर यांनी देखील त्यांच्या पाठोपाठ सफरचंद लागवडीचा धाडसी प्रयोग केला. सावरकरांनी देखील हिमाचल प्रदेशातून 1340 रोपे मागवत लागवड केली. त्यांच्या झाडांना सुद्धा फळ लागलेत. याशिवाय अकोट तालुक्यात वालसिंगे यांनी देखील सफरचंद लागवड केली. दरम्यान, दोन्ही शेतकरी सफरचंदाच्या झाडासाठी लागणार खत शेतातच तयार करतात. झाडांना थंड वातावरण मिळावं, यासाठी त्यांनी प्रत्येक झाडाच्या खाली गवत लावलय. जेणेकरून झाडांना काहीसा थंडावा राहील.  

शेतकरी ते थेट ग्राहक विक्री
जून महिन्याच्या सुरुवातीला सफरचंदाचे पीक हाती येणार असं चांडक सांगत आहेत. सुरुवातीला आपण शेतकरी ते ग्राहक विक्रीवरच भर देणार असल्याचे म्हटले. बाजारात किरकोळ पद्धतीने सफरचंदाची विक्री करणार असून बाजारात सफरचंदला मिळणाऱ्या भावाच्या तुलनेत आपण काहिसा दर कमी ठेवणार. कारण बाहेरून राज्यातील सफरचंद राज्यात आणण्यासाठी मोठा खर्च लागतो. तोच खर्च इथे वजा करीत सफरचंद विक्री करणार असल्याचं चांडक म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT