Cotton Seeds Saam tv
ऍग्रो वन

Cotton Seeds : कापूस बियाणं पॅकेट १४०० रुपयांना विक्री; अकोल्यात भरारी पथकाची कृषी केंद्रावर कारवाई

Akola News : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथील मेसर्स अश्विनी ऍग्रो एजन्सी इथल्या केंद्रावर हा प्रकार निदर्शनास आला आहे.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: कापसाचे बियाणे बाजारात मिळत नसल्यानं शेतकरी चांगलाचं आक्रमक होत आहे. एकीकडे कापसाच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे हाल सुरु आहेत. मात्र, अकोल्यात बी-बियाणांचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. कापसाचे बियाणे जादा दराने १४०० रुपयांना विक्री करणाऱ्या एका कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. 

अकोला (Akola) जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथील मेसर्स अश्विनी ऍग्रो एजन्सी इथल्या केंद्रावर हा प्रकार निदर्शनास आला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र चालक रामराव रामचंद्र पोहरे हे बियाणे विक्री केंद्रातून मेसर्स अजित सीड्स उत्पादित अजित १५५, बीजी २ या कापूस बियाण्याची जादा दराने विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाच्या (Agriculture Department) भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार मोहीम अधिकारी महेंद्रकुमार सालखे आणि कृषी अधिकारी भरत चव्हाण यांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून सदर बियाणे विक्री केंद्रावर छापा टाकला. 

केंद्र चालकावर गुन्हा दाखल 

मेसर्स अजित सीड्स उत्पादित संकलीत (Cotton) कापूस बियाणे वाण अजित -१५५, बीजी २ प्रति पाकीट १४०० रुपये याप्रमाणे जादा दराने विक्री होत करत असताना रंगेहात पकडण्यात आले. कृषी अधिकारी भरत चव्हाण यांनी मेसर्स आश्वनी ऍग्रो एजन्सीचे रामराव पोहरे यांच्या विरोधात विविध कलमान्वये तेल्हारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT