Leopard Attack Saam tv
ऍग्रो वन

Leopard Attack : बकऱ्या बांधून ठेवलेल्या गोठ्यात शिरून बिबट्याचा हल्ला; २० बकऱ्यांचा मृत्यू

Akola News : अकोला जिल्ह्यातील शेळद या गावात भल्या पहाटेच्या सुमारास हि घटना उघडकीस आली. शेतकरी संतोष गाढे यांनी बकऱ्याचे पालन केले आहे.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : शेतकऱ्याने बांधून ठेवलेल्या बकऱ्यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने हल्ला चढविला. यात बांधून ठेवलेल्या तब्बल २० बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील शेळद येथे ही घटना घडली आहे. यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

अकोला (Akola) जिल्ह्यातील शेळद या गावात भल्या पहाटेच्या सुमारास हि घटना उघडकीस आली. शेतकरी संतोष गाढे यांनी बकऱ्याचे पालन केले आहे. गाढे हे बकऱ्या पालन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्यासाठी एक गोठा तयार केला आहे. यात सर्व बकऱ्या बांधून ठेवलेल्या असतात. दरम्यान या गोठ्यात रात्रीच्या सुमारास बिबट्याने प्रवेश करत बकऱ्यांवर हल्ला (Leopard Attack) केला. यात तब्ब्ल २० बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सकाळी संतोष गाढे हे गोठ्यात गेले असता त्यांना गोठ्यात बांधलेल्या तब्बल २० बकऱ्या मृतावस्थेत निदर्शनास आलय. 

सदर घटनेबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. यानंतर वन विभागाने घटनास्थळी येत पंचनामा केला. बिबट्याने केलेल्या हल्यामुळे शेतकरी गाढे यांचे साधारण १ लाखाच्यावर नुकसान झाले आहे. वन विभागाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी व पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी संतोष गाढे यांनी केली आहे. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यानंतर शेळद गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Inspiring Story: दिव्यांग कलावंत राशीच्या स्वप्नांना मिळणार भरारी; शिक्षणाचे स्वीकारले पालकत्व!

Wednesday Horoscope : नवरा-बायकोमधील प्रेम वाढेल, धनसंपत्ती मिळेल; ५ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी

Ashok Kharat Case: शक्तीवर्धनासाठी पुढाऱ्यांना मधाचा चुना; राजकारण्यांना विकला 1 किलो मध,9 लाखाला?

Iran-US Conflict: इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकणार? अमेरिकेने इराणच्या दोन अटी नाकारल्या

सातासमुद्रापार मराठी अस्मितेचा जागर; मॉरिशसमध्ये महाराष्ट्र भवनाचा विस्तार, वास्तूसाठी ८ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT