Agriculture News Gram Crop Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News : हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी पुन्हा संकटात

Akola News : किडींच्या बंदोबस्तासाठी पुन्हा शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारण्याची वेळ आली आहे

Rajesh Sonwane

हर्षदा सोनोने 
अकोला
: अवकाळी पावसानंतर वातावरण बदलले आहे. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम पिकांवर झालेला (Akola) पाहावयास मिळत आहे. यात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकरी (Farmer) संकटात सापडला आहे. (Latest Marathi News)

अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील राहेर परिसरात गत काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. तर रब्बी हंगामातील गहू, तूर व हरभरा आदी पिकांवर विविध किडींनी हल्लाबोल केल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या किडींच्या बंदोबस्तासाठी पुन्हा शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारण्याची वेळ आली आहे. पण या बदलत्या वातावरणामुळे हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हरभरा पीक सुकायला लागले असल्याने राहेर येथील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांपुढे संकट कायम 

मागील दोन आठवड्यांपूर्वी अवकाळी पावसामुळे प्रचंड फटका बसला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. यानंतर आता अधूनमधून होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे एकामागून एक संकट उभे आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT