Cotton Crop Saam tv
ऍग्रो वन

Cotton Crop : कपाशीवर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव; रात्रीच्या वेळी करावी लागतेय फवारणी

Akola News : पुराच्या पाण्यात देखील हे पिके वाहून गेली होती. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहण्यास मिळाले होते. मात्र यातून शेतकरी जेमतेम सावरू लागला आहे.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : यंदा अधिक पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातून सावरत असताना शेतकरी कापूस वेचणीकडे वळला आहे. मात्र आता थंडी जाणवू लागण्यासोबतच धुके देखील पडू लागले आहे. यामुळे कपाशीच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव पडल्याचे पाहण्यास मिळत आहे. या अळ्या पाने व कपाशीच्या झाडावरील कैरी खात आहे. 

अकोला जिल्ह्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. यंदा अधिक पाऊस झाल्याने अनेकांची पिके पाण्याखाली गेली होती. तर पुराच्या पाण्यात देखील हे पिके वाहून गेली होती. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहण्यास मिळाले होते. मात्र यातून (Farmer) शेतकरी जेमतेम सावरू लागला आहे. यातच आता वातावरण बदल झाल्यामुळे कपाशी पिकांवर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. (Cotton Crop) कपाशीच्या प्रत्येकी झाडावर 50 ते 60 अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.  

फवारणी करूनही आटोक्यात येईना 

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या मरोडा आणि कुटासा परिसरात कपाशी पिकावर अळ्यांचा मोठा प्रादुर्भाव आहे. या अळ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी कपाशी पिकावर फवारणी करावी लागत आहे. फवारणीचा मोठा खर्च करूनही कपाशी पिकावरील अळ्यांचा प्रादुर्भाव होताना दिसत नाही. त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दरम्यान येथील शेतकरी कपाशीवरील अळ्या मोजतानाचे काही video देखील सोशल मीडियावर वायरल होत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT