Soybean Price
Soybean Price Saam tv
ऍग्रो वन

Soybean Price: सोयाबीनच्या दरात मोठी घट; पाच हजार रूपयांवर आले दर

जयेश गावंडे

अकोला : गेल्या दोन महिन्यांपासून अकोल्यातील (Akola) सोयाबीन बाजार मंदीत असून दरात सातत्याने घट नोंदविली जात आहे. डिसेंबरमध्ये सहा ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटलवर गेलेले सोयाबीन (Soybean) आता पाच हजार रुपयांवर येऊन ठेपले आहे. दोनच महिन्यात सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे बाराशे ते तेराशे रुपयांची घसरण झाली. (Letest Marathi News)

हंगाम संपुष्टात आल्यानंतरही दरात होत असलेली घसरण शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढवणारी आहे. गेल्या हंगामात हंगामापूर्वी सोयाबीनने चांगलाच भाव खाल्ला होता. ९ ते १० हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली.

दरवाढीच्‍या अपेक्षेने केली साठवणूक

यावर्षी सोयाबीनचे बाजारभाव सुरुवातीपासूनच दबावात आहे. त्यामुळे गतवर्षीनुसार दरवाढीच्या अपेक्षेने साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांचा (farmer) अपेक्षाभंग होत असून, आता तर क्विंटलमागे १२०० ते १३०० रुपयाचे नुकसान सहन करावे लागत आहे. सोयाबीनच्या घसरत्या दराने शेतकऱ्यांत धाकधूक वाढली. दरम्यान, हंगामाच्या अंतिम टप्प्यात तसेच हंगामानंतर गतवर्षीप्रमाणे दर उसळी घेतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT