Akola News Urea Deficiency Saam tv
ऍग्रो वन

Urea Deficiency : युरियाचा कृत्रिम तुटवडा; शेतकऱ्यांच्या कृषी केंद्रावर युरिया खरेदीसाठी रांगा

Akola News युरियाचा कृत्रिम तुटवडा; शेतकऱ्यांच्या कृषी केंद्रावर युरिया खरेदीसाठी रांगा

Rajesh Sonwane

हर्षदा सोनोने 
अकोला
: अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना पिकांच्या वाढीसाठी युरिया घ्यावा लागतो. मात्र सध्या जिल्ह्यात (Akola) युरियाचा कृत्रिम तुटवळा निर्माण करण्यात आला आहे. यामुळे शहरातील बाजारपेठेत शेतकऱ्यांना (Farmer) युरिया मिळण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. (Breaking Marathi News)

आधीच विलंबाने आलेल्या पावसामुळे पेरणी देखील उशिराने झाली आहे. यामुळे पीकवाढीचा कालावधी हा कमी झाला आहे. तर जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात चार दिवस दमदार पाऊस  झाल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या युरियाचा डोस देण्यासाठी शेतकरी लगबग करत आहे. परंतु अकोला जिल्ह्यातील काही भागात तुटवडा जाणवत आहे.  

टंचाई कि काळाबाजार 

पायपीट करूनही शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही. त्यामुळे पीकवाढीच्या नेमक्यावेळी युरिया मिळत नसेल, तर पिकांची वाढ खुंटून पीक धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच युरियाची कृत्रिम टंचाई ही बाब शेतकऱ्यांच्या पचनी पडत नसून, खरंच तुटवडा की काळाबाजार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड, 3 मतदान कार्ड; काँग्रेसची चौकशीची मागणी

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

Belly Fat Loss Exercise: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे व्यायाम; घरच्या घरी मिळवा फिट आणि सडपातळ शरीर

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

SCROLL FOR NEXT