Akot Unseasonal Rain Saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain : अकोट तालुक्यात गारपिटीचा तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Akola News : हवामान विभागाने अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानूसार आज अकोला जिल्ह्यातील अकोट, बाळापुर आणि तेल्हारा सोबत बार्शी टाकळी तालुक्यात दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली

Rajesh Sonwane


अक्षय गवळी 

अकोला : राज्यात अवकाळी पावसाचे थैमान अजूनही सुरूच आहे. या दरम्यान आज (Akola) अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपिट झाली आहे. सोबतच अवकाळी पावसाने (Rain) चांगलंच झोड़पले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. (Latest Marathi News)

मागील दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचे आगमन होत आहे. तर हवामान विभागाने अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानूसार आज अकोला जिल्ह्यातील अकोट, बाळापुर आणि तेल्हारा सोबत (Barshi) बार्शी टाकळी तालुक्यात दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर अकोट तालुक्यात मोठी गारपिट झाली आहे. जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस तर (Akot) अकोट तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीचा तडाखा बसला आहे.



('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान आधीच अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला (Farmer) शेतकरी पुन्हा एकदा आजच्या पावसाने आणि गारपिटीनं हतबल झाला आहे. दरम्यान अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाल्याचं अनुमान लावला जात आहे. एकंदरीत आकोट तालुक्यात शेतकऱ्यांच्या फळबागाला मोठा फटका बसला. तर दुसरीकडे वाढत्या उन्हाच्या तापमानात आजचा पाऊस अकोलेकरांना काहिसा दिलासादायक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विकास लवांडे यांना अटक करा, वारकरी सांप्रदायाकडून वाघोली पोलीस ठाण्यात आंदोलन

भाजपच्या मित्रपक्षात मोठी फूट; ३६ आमदारांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पुकारले बंड, राजकारणात खळबळ

Shocking: बायकोचे अनेकांसोबत प्रेमसंबंध, घरी यायचे बॉयफ्रेंड; प्रायव्हेट व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या

Kavala Kiti Varsh Jagto: कावळ्याचं आयुष्य किती असतं? किती वर्ष जगतो? माहितीये का

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल 415 रुपयांपार, पाकिस्तानी जनतेची झोप उडाली

SCROLL FOR NEXT