Farmer Rasta Roko Saam tv
ऍग्रो वन

Farmer Rasta Roko : भर उन्हात शेतकऱ्यांचा रास्ता रोको; शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर तीव्र पाणी टंचाईचे संकट असून पिके करपू लागली आहेत. यामुळे राहुरी तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

राहुरी (अहमदनगर) : मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडावे; या मागणीसाठी राहुरी येथे शेतकऱ्यांनी नगर- मनमाड महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी अर्धनग्न होत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. तसेच लवकरात लवकर शेतीसाठी पाणी सोडले नाही, तर हजारो शेतकऱ्यांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला.

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यावर तीव्र पाणी टंचाईचे संकट असून पिके करपू लागली आहेत. यामुळे राहुरी तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेती पिकांसाठी पाणी सोडावे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी (Farmer) नगर- मनमाड महामार्गावर अर्धनग्न होत रास्ता रोको आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. 

तर आंदोलन तीव्र करणार 

वारंवार निवेदन देऊनही प्रशासन दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांना भर उन्हात रस्त्यावर उतरून आंदोलन (Rasta Roko) करावे लागले. शेतीसाठी आवर्तन सोडले नाही; तर अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे आणि शेतकऱ्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

Bhoj Dam : भोज धरणावर मस्ती भोवली; पर्यटक पाण्याच्या प्रवाहात अडकला, सुदैवाने वाचला जीव

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबात वादग्रस्त पोस्ट, पुण्यात मनसैनिक आक्रमक; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

Karnatak Mangaluru Bus Accident : दोन भरधाव बस एकमेकांना धडकल्या; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद,१४ विद्यार्थी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT