Onion गोविंद साळुंके
ऍग्रो वन

एक एकरात तब्बल 25 क्विंटल कांद्याचे उत्पादन, पहा पठ्ठ्याची कमाल

निसर्गाच्या लहरिपणामुळे शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे.

गोविंद साळुंके

अहमदनगर: निसर्गाच्या लहरिपणामुळे शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. पिकांच्या उत्पादनामध्ये घट होण्यामागे एक ना अनेक कारण आहे दिली जात असतात. मात्र, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कांदा (Onion) वाढीसाठी योग्य आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून एक- एक्कर मध्ये २५ टन कांद्याचे उत्पादन घेतले आहे.राहाता तालुक्यातील राजुरी गावातील (village) प्रयोगशील शेतकरी बी टी गोरे शेतकरी यांनी एक एक्कर शेतीमध्ये बेड पद्धतीने अडीच लाख कांद्याची रोपे लावली होती.

हे देखील पहा-

यामध्ये पाण्याचं सूक्ष्म नियोजन फवारणीचे वेळापत्रक (Schedule) घेतल्याने त्यांना अवघ्या ४ महिन्यांत २५ टन कांद्याच विक्रमी उत्पादन मिळाल आहे. शेतकरी गोरे यांनी शेतीमध्ये आत्तापर्यंत वेगवेगळे प्रयोग केले आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्येही काहीच अशक्य नाही शेतकरी (Farmers) गोरे यांनी दाखवून दिल आहे. गोरे शेतकऱ्यांचे या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी केलेल्या कांदा उत्पादकचा विक्रमी प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत.

डाळींबासाठी त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना डाळींबरत्न नावाने देखील ओळखले जात आहे. वडिलांनी परंपरागत शेती केली आहे. मात्र, शेती नफ्याची कशी करावी आणि इतर शेतकरी सुद्धा कसे सधन होणार यासाठी काम करत असल्याचे बाबासाहेब गोरे यांनी सांगताना कांदा पीक लागवडीची माहिती देखील दिली. दरम्यान राज्यातील शेतकरी आज आर्थिक संकटात सापडला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अशा प्रकारे शेतीची उत्पादन क्षमता वाढवणे गरजेचे असून गोरे यांच्या सारखे प्रयोग शेतीत राबविले तर बळीराजाचे उत्पन्न वाढण्यास मदत मिळेल हे मात्र नक्की राहणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT