Ahmednagar News Saam tv
ऍग्रो वन

Ahmednagar News : ऐन पावसाळ्यात पिके वाचवण्यासाठी धडपड; पिकांना स्प्रिंकलरने दिले जातेय पाणी

Ahmednagar News : पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्यांच्याकडे बोअरवेल आणि विहिरींमध्ये थोड्याफार पाण्याची उपलब्धता आहे.

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

राहाता (अहमदनगर) : उत्तर नगर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सुरुवातीला झालेल्या थोड्या पावसानंतर शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पेरण्या केल्या होत्या. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले असून पिके वाचविण्यासाठी स्प्रिंकलरने पाणी देण्याची वेळ आली आहे. 

पाऊस (Rain) नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्यांच्याकडे बोअरवेल आणि विहिरींमध्ये थोड्याफार पाण्याची उपलब्धता आहे. असे शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पिकांना पाणी देत आहेत. ऐन पावसाळ्यात देखील उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmer) पिके वाचवण्यासाठी स्प्रिंकलरचा आधार घ्यावा लागतो आहे. राहाता तालुक्यातील प्रकाश शेळके यांनी सध्या शेतात स्प्रिंकलर लावले आहेत. 

चाऱ्याचा प्रश्न सुटावा 

पाऊस नसल्याने बहुतांश ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत. किमान जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटावा; यासाठी काही शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली आहे. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने चारा पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

SCROLL FOR NEXT