Beed : अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने 25 वर्षीय शेतकऱ्याने घेतला गळफास!
Beed : अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने 25 वर्षीय शेतकऱ्याने घेतला गळफास! विनोद जिरे
ऍग्रो वन

Beed : अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने 25 वर्षीय शेतकऱ्याने घेतला गळफास!

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने ग्रासलेल्या पुन्हा एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन अतोनात नुकसान झाल्यानं, खचून गेलेल्या 25 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीय.

हे देखील पहा :

ही घटना बीडच्या केज तालुक्यातील साळेगाव येथे आज घडलीय. बाळासाहेब रामलिंग गीते वय 25 वर्ष असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. हा तरुण शेतकरी या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे नैराश्यात होता. यातूनच त्याने साळेगाव शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, याची माहिती मिळताच केज पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी केज पोलिसात नोंद झाली असून मयत बाळासाहेब गित्ते यांच्या पश्चात पत्नी कोमल वय 24 मुलगा आदित्य वय 6, मुलगी अंजली वय 4 असा परिवार असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Interview: पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? स्वत: मोदींच केला खुलासा

Today's Marathi News Live: अमोल किर्तीकर यांचा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रोड शो

Amravati Crime : अमरावतीत गुंतवणुकीच्‍या नावाखाली ऑनलाईन फसवणुक, 10 अटकेत; 31 लाख 35 हजार लाटले

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

Maharashtra Politics 2024 : '४ जूनला आमच्या शपथविधीला या'; उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं निमंत्रण

SCROLL FOR NEXT