harbhara, farmers, beed saam tv
ऍग्रो वन

NAFED : बीडला हरभरा खरेदीसाठी 15 केंद्र सुरू; 31 मार्चपर्यंत नाेंदणी, 11 जूनपर्यंत खरेदी

या खरेदी केंद्रांवर केवळ नोंदणीच सुरू नसून 273 शेतकऱ्यांचा 4 हजार 767 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.

विनोद जिरे

Beed : बीड जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यात नाफेड कडून हरभरा खरेदीसाठी 15 केंद्र सुरू करण्यात आली आहे आहेत. आतापर्यंत किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत, जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून नाफेडच्या वतीने हरभरा खरेदीसाठी 10 हजारावर शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. (Maharashtra News)

या खरेदी केंद्रांवर केवळ नोंदणीच सुरू नसून 273 शेतकऱ्यांचा 4 हजार 767 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. दरम्यान हरभऱ्यासाठी नोंदणीची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत असून खरेदी कालावधी 11 जूनपर्यंत असल्याची माहिती जिल्हा पणन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान गत दोन महिन्यांपासून बीडसह जिल्ह्यातील अन्य कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला 4 हजार 500 पेक्षा जादा भाव मिळालेला नाही. शासनाचा हमीभाव 5 हजार 335 आहे तर खुल्या बाजाराचा 4 हजार 550 भाव आहे. शासनाचा हमीभाव जास्त असल्याने शेतकरी नाफेडच्या केंद्रांवर नोंदणी करून हरभरा विक्रीसाठी आणत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loyal boyfriend zodiac signs: कोणत्या राशींचे पुरुष असतात लॉयल बॉयफ्रेंड?

Maharashtra Live News Update: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

Thane Traffic Alert : ठाणे - घोडबंदर मार्ग पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

SCROLL FOR NEXT