Saam Banner Template (29).jpg
Saam Banner Template (29).jpg 
आज पाहा

अ‍ॅलोपॅथी विरुद्ध रामदेव बाबा जिंकणार कोण ?  

राजू सोनावणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - रामदेव बाबांच्या Ramdev Baba  अ‍ॅलोपॅथीवरील Allopathy विधानाने अ‍ॅलोपॅथी डॉक्टर्स Doctor नाराज आहेत. अ‍ॅलोपॅथी डॉक्टर्सच्या निवासी डॉक्टर्स संघटनेने आज काळा दिवस Black Day पाळत बाबांचा निषेध केला. योग गुरु बाबा रामदेव विरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशन Indian Medical Association असा वाद आता विकोपाला पोहचला आहे. अ‍ॅलोपॅथी मूर्ख विज्ञान आहे असे म्हणणाऱ्या बाबा रामदेव विरोधात देशभरातील अ‍ॅलोपॅथी डॉक्टर्स एकवटले आहेत. दिल्लीत एम्स मधील निवासी डॉक्टरांनी बाबाच्या अ‍ॅलोपॅथी विरोधी व्यक्तव्याच्या विरोधात काळा दिवस पाळला.  Ramdev Baba against Allopathy Who will win

रामदेव बाबाच्या विरोधात फोर्ड या निवासी डॉक्टर्स संघटनेने आपली भूमिका मंडळी आहे. रामदेव बाबा यांच्याकडे आयुर्वेदाची डिग्री नाही. त्यांच्याकडे अ‍ॅलोपॅथीबद्दल बोलण्याची क्षमता देखील नाही. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे कोरोना महामारीशी लढणार्‍या डॉक्टरांच्या मनोधैर्य खचले आहे. त्यामुळे रामदेव बाबांनी बिनशर्त जाहीर माफी मागितली पाहिजे अन्यथा त्यांच्यावर साथीच्या रोग अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी फोर्डच्या डॉक्टर्सनिवासीसंघटनेने केली आहे.

रामदेव बाबांच्या अ‍ॅलोपॅथी विरोधी विधानानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहित त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यावर हर्षवर्धन यांनी रामदेव बाबांना एक पत्र लिहून अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांची माफी मागण्याची विनंती केली. त्यानंतर राम देव बाबांनी माफी मागितली खरी, पण रोज राष्ट्रीय वाहिन्यांवर अ‍ॅलोपॅथी विरोधात गरळ ओकण्याचे काम सुरुच ठेवले आहे. त्यामुळे अ‍ॅलोपॅथी डॉक्टर्स आणि बाबा रामदेव यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे .  Ramdev Baba against Allopathy Who will win

त्यात कोरोनावर "कोरोनील 'आयुर्वेदिक औषध आणण्याचा प्रचार करणाऱ्या रामदेव बाबांनी आता ब्लॅक फंगस वर लवकरच औषध आणण्याचा दावा केला आहे. अर्थात कोरोनिलला कोणतीही मान्यता नसताना ते मार्केट मध्ये आणले होते. त्यात बाबा आता पुढे जाऊन ब्लॅक फंगस वर आयुर्वेदिक औषधाचा दावा करत आहेत. मोदी सरकारचा बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद संस्थेला पाठींबा असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत राहिला आहे. अर्थात या आरोपाला पूष्टी ही मिळते . भाजप नेते आणि त्यांच्या पक्षाचे मंत्री यांची बाबा रामदेव यांच्याशी असलेली जवळीक लपून राहिलेली नाही.

हे देखील पहा -

रामदेव बाबांच्या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांची उपस्थिती नेहमी चर्चेचा विषय राहिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारी शी असलेल्या या जवळीकतेमुळे, 'हिम्मत असेल तर अटक करून दाखवा' असे बोलण्यापर्यंत बाबांची मजल गेली आहे.  रामदेव बाबांनीअ‍ॅलोपॅथीवरील उपचारावर प्रश्न उपस्थित केल्यामुळे, आता अ‍ॅलोपॅथी विरुद्ध रामदेव बाबा यांचे आयुर्वेद असा संघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यामुळे आता ऍलोपॅथी डॉक्टर्स सुद्धा आंदोलनाच्या मूड मध्ये दिसत आहेत. तर बाबा रामदेव आयुर्वेदाला पुढे करत संघर्षाच्या पावित्र्यात आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT