मनोज जयस्वाल
वाशीम : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाशीम जिल्ह्यातील सर्व मुख्य बाजार समित्या आणि उपबाजारात शेतकऱ्यांमधून सोयाबीन विक्रीसाठी आणला जात आहे. यामुळे जिल्ह्यात विक्रमी २५ हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली आहे. अर्थात बाजार मिळेल त्या दरात सोयाबीन विक्रीवर भर आहे.
यंदाच्या खरीप हंगामात प्रत्यक्ष २ लाख ९९ हजार २२१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची (Soyabean) पेरणी झाली आहे, ज्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. सोयाबीन काढणी केल्यानंतर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला जात आहे. दिवाळीचा सण तोंडावर असल्याने शेतकरी सोयाबीनच्या विक्रीकडे लक्ष केंद्रित करत आहेत. या सणासह देणी- घेणी करण्यासाठी शेतकरी सोयाबीनची विक्री करण्यावर भर देत आहेत. यामुळे (Washim) जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक दिवसेंदिवस वाढत आहे.
बाजार समित्यांत सोयाबीनची विक्रमी आवक होत. जिल्ह्यातील सर्व मुख्य बाजार समित्या आणि उपबाजार मिळून २५ हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली. जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीमध्ये १२ हजार क्विंटलची विक्रमी आवक झाली. तर वाशिम बाजार समितीमध्ये ५ हजार ८०० क्विंटलची आवक झाली होती. मंगरूळपीर बाजार समितीमध्ये दोन हजार क्विंटलची आवक झाली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.