Wardha News : गारपिटीने मोडलं शेतकऱ्यांचे कंबरडे, देवळी तालुक्यात शेती पिकांचे मोठे नुकसान

Wardha News : विजयगोपाल मंडळातील इंझाला, विजयगोपाल, तांबा, नांदगाव, शेंद्री या गावातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कुठे जमीनदोस्त झालेली गहुची पिके तर कुठे चण्याच्या पिकांचे नुकसान.भाजीपाला पिके तर पूर्ण उध्वस्त झाली.
Wardha News
Wardha News Saam tv
Published On

चेतन व्यास 

वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यात १० फेब्रुवारीला संध्याकाळी झालेल्या गरपीटीने शेतकऱ्यांचे कंबरड मोडलय. बोराच्या आकाराची पडलेल्या गारपीटने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. देवळी (wardha) तालुक्याच्या विजय गोपाल मंडळातील सर्वच गावांसह इतर गावातही शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हरभरा, तूर, कापूस, गहू, टरबूज पिकांसह भाजीपाला पिकांच नुकसान या भागात झाले असून (Farmer) शेतकऱ्यांनी तात्काळ मदतीची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

Wardha News
Shahada Crime : मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेले अडीच लाख केले लंपास

विजयगोपाल मंडळातील इंझाला, विजयगोपाल, तांबा, नांदगाव, शेंद्री या गावातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कुठे जमीनदोस्त झालेली (Wheat) गहुची पिके तर कुठे चण्याच्या पिकांचे नुकसान.भाजीपाला पिके तर पूर्ण उध्वस्त झाली. या परिसरातील शेती पिकांचे ९० टक्के नुकसान झाल्याच शेतकरी सांगतात. निंबाच्या आकाराची झालेली गरपीट ही शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांनी तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wardha News
Akola Crime : धक्कादायक.. जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आढळले ४ नवजात अर्भक

पीक विमा कंपनीच्या पोर्टलवर समस्या 
एकीकडे सरकारने एक रुपयात शेतकऱ्यांचा पीक विमा काढला. नुकसानीचा मोबदला मिळणार असं सांगण्यात आलं. पण अनेक शेतकरी खरीपमध्ये झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यापासून वंचित आहे. गारपीटीने झालेल्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या ऑनलाईन तक्रार नोंदणी पोर्टलवर तक्रार करण्याचा प्रयत्न केला. पण संकेतस्थळावरून प्रतिसाद शेतकऱ्यांना मिळत नसून तक्रारीचा ओटीपी सुद्धा मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी सरकारने याकडे लक्ष देत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यांचे तक्रार नोंदवावी व ज्या पीक विमा काढला नाहीय त्यांनाही तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जातं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com