Wardha News : विद्युत पुरवठा बंद झाल्याने उष्णता वाढून पोल्ट्री फार्ममधील १५०० कोंबड्यांचा मृत्यू

Wardha News : उन्हाळा व हिवाळ्यात प्रामुख्याने पोल्ट्री फॉर्ममधील कोंबळ्याची निगा योग्य पद्धतीने ठेवावी लागते
Poultry Farm
Poultry FarmSaam tv
Published On

चेतन व्यास 

वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या वायफड येथे विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला. यामुळे पोल्ट्री फार्ममधील पंधराशे कोंबड्याचा उष्णता वाढल्याने मृत्यू झाला. यात पोल्ट्री फॉर्म चालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.  

Poultry Farm
Lightning Strike : वीज अंगावर पडून वेगवेगळ्या घटनेत दोन जणांचा मृत्यू; अन्य दोन जखमी

शेख निसार शेख करीम याने वायफड येथे पोल्ट्रीफार्म टाकला आहे. या पोल्ट्री फॉर्ममध्ये पाच हजार (Wardha) कोंबड्यांचे पालन करत आहे. उन्हाळा व हिवाळ्यात प्रामुख्याने पोल्ट्री फॉर्ममधील कोंबळ्याची निगा योग्य पद्धतीने ठेवावी लागते. पोल्ट्री फॉर्ममधील तापमान संतुलित ठेवावे लागत असते. एकीकडे तापमानाचा (Temperature) पारा वाढला असतांना अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शेडमधील तापमान वाढल्याने १५०० कोंबड्यांच मृत्यू झाला. 

Poultry Farm
Milk Subsidy : दुधाच्या अनुदानापासून शेतकरी वंचित; रस्त्यावर दूध ओतून केला शासनाचा निषेध

लाखोंचे नुकसान 

पोल्ट्री फॉर्म (Poultry Farm) सुरु करून त्यात कोंबळ्याची निगा योग्य पद्धतीने राखण्यासाठी खर्च करावा लागत असतो. मात्र या घटनेमुळे शेख निसार या शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यामुळे आर्थिक मदतीची मागणी शासनाला केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com