Vanchit Bahujan Aghadi : सरकारने कापसाला (cotton price) प्रतिक्विंटल दहा हजार रुपये भाव द्या अशी मागणी आज (शुक्रवार) वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) केली आहे. त्याबाबतचे निवदेन 'वंचित' ने अकाेला (akola latest news) जिल्हाधिकारी यांना दिले आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रमाेद डेंडवे यांनी दिली.
अतिवृष्टी व नैसर्गिक संकटामुळे शेतमालाचे उत्पन्न कमी होत आहे. त्यात शेतक-यांना (farmers) पेरणीचा खर्च मजुरी मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शेतक-यांचे रोजचे जगणे व पोट भरणेही कठीण झाले आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (Maharashtra News)
जर केंद्र सरकारने (central government) आपले आयात (import) व निर्यात (export) धोरण व्यवस्थीत राबविल्यास शेतक-यांच्या कापसाला म्हणजेच या पांढ-या सोन्याच्या पिकाला प्रतिक्विटल रुपये दहा हजाराचेवर भाव मिळणे सहज शक्य होऊ शकते. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतक-यांना शासनाने कापसाला रुपये दहा हजार (farmers demand ten thousand rupees per quintal for cotton) भाव द्यावा असेही निवेदनात म्हटलं आहे.
अन्यथा शेतक-यांच्या या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी अकाेल्यातील रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन (aandolan) करेल असा इशारा वंचितने आज निवेदनाद्वारे सरकारला दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, जि. प. अध्यक्ष संगीता अढावू, कृषी व पशुसंवर्धन सभापती योगीता रोकडे, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन शे मुक्तार, शिक्षण सभापती माया संजय नाईक, जि. प. सदस्य पुष्पा इंगळे आदी उपस्थित हाेते.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.