Jalna : क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याचे Gujarat कनेक्शन, किरण खरातसह पत्नीच्या अडचणीत वाढ; ९ कोटींचा मुद्देमाल जप्त

आत्तापर्यंत ९ कोटी रुपयांचा मुद्देमाल रिकव्हर केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
Jalna,
Jalna, saam tv
Published On

Vijay Zol News : जालन्यात (jalna latest news) शिंदे गटाचे शिवसेना (shivsena) नेते अर्जुन खोतकर (arjun khotkar) यांचे जावई विजय झोल (vijay zol) आणि माजी आमदार विलास बापू खरात (vilas bapur kharat) यांचे पुतणे किरण खरात (kiran kharat) यांच्या वादा नंतर क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे १२२ जणांनी फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या. यानंतर पोलिसांनी (jalna police) आत्ता पर्यंत ९ कोटी ४२ लाख रिकव्हर केले. तर कोट्यावधींच्या ६ महागड्या गाड्या जप्त केल्या आहे.

Jalna,
Vijay Zol News : लोकांचे बुडालेले पैसे द्या अन्यथा तुमच्या घरावर मोर्चा काढू; काॅंग्रेस आमदारांना इशारा

या प्रकरणात पोलिसांनी (police) गेल्या आठवड्यात पुणे (pune) आणि इचलकरंजी (ichalkaranji) शहरातून इरफान मोईद्दीन सय्यद, वेंकटेश दशरथ भोई,अमोद वसंतराव मेहतर,रमेश बाबुराव उत्तेकर या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ३ लपटॉप,३ संगणक,९ मोबाईल चार महागड्या कार असा २ कोटी ४४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

संशयित आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या विविध बँक खात्यात असलेली ३ कोटी ४४ लाख रुपयांची खाती गोठवली होती. चार ही संशयित आरोपींना न्यायालयात (court) हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ झाली.

Jalna,
Nalasopara : नालासाेपारा पाेलिस ठाण्यात जेवणातून विषबाधा; नऊ जण रुग्णालयात दाखल

या चौकशी दरम्यान पोलिसांना या घोटाळ्यातील वेबसाईटचे काम गुजरात मधील राजकोट मधून सुरू चालू असल्याची महिती समोर आली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सायबर एक्सपोर्टच्या मदतीने सर्व्हर हँडल करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेत सर्व्हर सॉफ्टवेअर ताब्यात घेतले आहे. त्याच बरोबर अटक करण्यात आलेल्या चौघांच्या ताब्यातून आणखी दोन महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान काल पर्यंत पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात ९ कोटी रुपयांचा मुद्देमाल रिकव्हर केल्याची माहिती दिली.

दरम्यान क्रिप्टो करंसी प्रकरणी अटकेत असलेला मुख्य सुत्रधार आरोपी सय्यद इरफान ह्याने स्वत:बद्दल धक्कादायक खुलासे केले असल्याची माहिती ही समोर आलीय. त्यांनी आपल्याकडे तीन वेगवेगळ्या नावाचे पासपोर्ट असल्याची माहिती ही आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना देत १४ वेगवेगळ्या नावाने देशभरात राज्यात वावरत असल्याचं ही महिती समोर आलं आहे. (Maharashtra News)

Jalna,
RS 1 Crore 97 Lakh Stolen : कारमधून एक काेटी 97 लाखांची बॅग लंपास; जाणून घ्या नेमकं काय घडलं

प्रत्येक राज्यात नवीन नाव धारण करून तो व्यवहार करत असल्याचं ही धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या क्रिप्टो करंसीची व्याप्ती देशभर पसरली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सय्यद इरफान हा काही वर्षांपूर्वी औरंगाबाद शहरात गॅरेज चालवत असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणात आता एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान या क्रिप्टोकरन्सी प्रकरणातील जीडीसीसी कॉइन प्रमोटर किरण खरात आणि त्यांची पत्नी फरार असून त्यांनी अटक पूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र काल जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज ही फेटाळला असल्याने किरण खरात आणि त्यांच्या पत्नीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com