sugarcane
sugarcane Saam Tv

अतिरिक्त ऊसामुळे यंदा मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरी संकटात

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील कारखाने ऊस संपेपर्यंत गाळप सुरू ठेवावे, अशा सूचना औरंगाबादच्या महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
Published on

औरंगाबाद - अतिरिक्त ऊसामुळे (Sugarcane) यंदा मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरी (Farmer) संकटात सापडला आहे. गळीप हंगाम सुरु होऊन अर्ध्याहून अधिक काळ लोटला तरीही ५० टक्के म्हणजेच तीन लाख ५० हजार हेक्टरवरील ऊस शेतात उभा असल्याने शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील कारखाने ऊस संपेपर्यंत गाळप सुरू ठेवावे, अशा सूचना औरंगाबादच्या (Aurangabad) महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

हे देखील पहा -

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातल्या ५८ साखर कारखानदारांना गाळप क्षमता वाढविण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही त्रास सहन करावाच लागतो. मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, सीईओ, साखर सहसंचालक, खासगी व सहकारी साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक यांची बैठक ऑनलाइन पार पडली. त्यात गाळपाविना अर्ध्यापर्यंत ऊस तसाच असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आता ३१ मेपर्यंत गाळप झाले पाहिजे, अशा सूचना कारखानदारांना करण्यात आल्या आहेत.

sugarcane
नाणार गाव वगळून ग्रीन रिफायनरी प्रकल्प ठरलेल्या जागेवरच होणार - नितेश राणे

शिवाय गाळप वाढविण्यासाठी तीन शिफ्टमध्ये कारखाने चालवावे, ऊसतोडीसाठी माणसे नसतील तर शेजारच्या जिल्ह्यातून ऊसतोड यंत्र मागवून घ्यावे आणि ऊस संपेपर्यंत कारखाने बंद करायचे नाहीत, असे महसूल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहेत. आता पावसाळ्यापूर्वीचे एप्रिल आणि मे असे दोन महिने उरलेले आहेत, त्यामुळे शेतात उभा असलेला ऊस कारखान्यात पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांची भर उन्हाळ्यात पळापळ दिसणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com