नाणार गाव वगळून ग्रीन रिफायनरी प्रकल्प ठरलेल्या जागेवरच होणार - नितेश राणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाप्रमाणे जी जागा ठरली आहे तिथेच ग्रीन रिफायनरी होणार आहे.
Nitesh Rane
Nitesh RaneSaam TV
Published On

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग - ग्रीन रिफायनरी प्रकल्प त्याचं जागेवर होणार असून फक्त नाणार गाव वगळून जिथे समर्थन आहे त्याच जागेवर रिफायनरी होणार असल्याची माहीती कणकवली, देवगडचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देवगड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

हे देखील पहा -

या संदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यासोबत दिल्लीत बैठक होणार असून केंद्रीय मंत्री नारायण राणे, देवेंद्र फडणवीस व रिफायनरी संबंधित सर्व लोकप्रतिधी या बैठकीस उपस्थित असणार आहेत. या संदर्भात केंद्र सरकार राज्य सरकारशी फक्त बोलणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाप्रमाणे जी जागा ठरली आहे तिथेच ग्रीन रिफायनरी होणार आहे.

आता विरोध कोणाचा राहीला नसून बारसू वैगरे गावात ग्रीन रिफायनरी होणार असल्याची चर्चा शिवसेनेच्या काही नेत्यांनी व राज्य सरकार मधील काही मंत्र्यानी सुरू केली आहे ती फक्त त्यांच्या पुरती सिमीत आहे. आता ग्रीन रिफायनरी जिथे पुर्वी पासून ठरली होती त्याचं जागेवर आणि ज्या गावांचा विरोध होता ती गावे वगळून लवकरच होणार असल्याची माहीती नितेश राणेंनी दिली आहे.

Nitesh Rane
तडीपार सराईत गुन्हेगारांना खडकपाडा पोलिसांकडून अटक

नितेश राणे वरळीमधे आल्यावर आदित्य ठाकरे घाबरतात तसे आदित्य ठाकरे देवगड मधे आल्यावर नितेश राणे घाबरत नाहीत हाच संदेश त्यांना मी काल दिला आहे अस म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेच्या देवगड दौऱ्यावरून खोचक टोला लगावला आहे

मी वरळी मतदार संघात गेलो किंवा तारीख ठरली तरी तीथे भितीचं वातावरण पसरत. तीथे लगेच शिवसैनिकांना गोळा केलं जात. आमदार, नगरसेवकानां संदेश जातात की नितेश राणे येत आहेत. तूम्ही सर्वजन गोळा व्हा तसेच पोलीस फौजफाटा वाढवला जातो, तशी भिती मला नाही ते माझ्यामतदार संघात येऊ शकतात नागरीकांशी चर्चा करू शकतात मतदारांना भेटू शकतात. मला माझ्या मतदारांवर पुर्ण विश्वास आहे असा टोला देखील नितेश राणेंनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com