लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा Ausa तालुक्यातील मातोळा येथील निर्मला शिवाजी भोसले आणि प्रफुल्ल भोसले या शेतकऱ्यांच्या ऊसाला शॉकसर्किटने Shockcircuit आग लागून दोन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली असून या आगीत चार लाखाचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. (Sugarcane burnt by shock circuit)
मातोळा येथील शिवारात गट क्रमांक 13 मध्ये निर्मला भोसले यांची अडीच एकर व प्रफुल्ल भोसले यांची शेती आहे शेतात ऊसाचं पिक होतं याच क्षेत्रातून महावितरणच्या MSEDCL उजनी ते मातोळा Matola 33 के.व्ही.च्या तारा गेल्या आहेत. गुरूवारी सायंकाळी सातच्या दरम्यान या वीज तारामध्ये शॉकसर्किटने झाल्याने ठिणग्या उसावर पडल्या आणि ऊसाला आग लागली होती आगीची माहिती तेथील शेजारी असलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी भोसले कुटुंबियांना सांगितले.
दरम्यान ऊसाला लागलेली आग विझविण्यासाठी गावातील तरूणांनी शेतात धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र या आगीत कष्टाने उभा केलेला निर्मला भोसले यांचा अडीच एकरातील ५० गुंठे व प्रफुल्ल भोसले यांचा २० गुंठे ऊस जळून खाक झाला आहे. मात्र उर्वरित ऊसाचे पीक वाचविण्यात शेतकऱ्यांना यश आले असून सध्या साखर कारखाने बंद असल्यामुळे या ऊसाचे करायचे काय असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. महावितरण MSEDCL Company कंपनीच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे या कंपनीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असा आरोप करीत आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार, भादा पोलिस ठाणे यांना दिले आहेत
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.