धक्कादायक ! शेतकऱ्याचे हातपाय बांधुन दरोडेखोरांनी 25 शेळ्या पळवल्या

बाप-लेकीचे हातपाय बांधुन दरोडेखोरांनी 25 शेळ्या पळवल्याचा धक्कादायक प्रकार, बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात असणाऱ्या अरणवाडी येथे आज उघडकीस आला आहे
धक्कादायक ! शेतकऱ्याचे हातपाय बांधुन दरोडेखोरांनी 25 शेळ्या पळवल्या
धक्कादायक ! शेतकऱ्याचे हातपाय बांधुन दरोडेखोरांनी 25 शेळ्या पळवल्याविनोद जिरे
Published On

विनोद जिरे

बीड - बाप-लेकीचे हातपाय बांधुन दरोडेखोरांनी 25 शेळ्या पळवल्याचा धक्कादायक प्रकार, बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात असणाऱ्या अरणवाडी येथे आज उघडकीस आला आहे. लहान मोठ्या 25 शेळ्या चोरून नेल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. या घटनेत जखमी झालेल्या बाप आणि लेकीला धारूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने धारूर तालुक्यात खळबळ उडाली. Shocking! The robbers tied up the farmer's limbs and snatched 25 goats

हे देखील पहा -

धारूर तालुक्यातील अरणवाडी येथील अर्जुन डोंगरे (वय 80) व त्यांची मुलगी कौशल्या अभिमान भालेराव (वय 48) हे दोघे गावाच्या जवळच राहतात. त्यांच्याकडे लहान मोठ्या 20 ते 25 शेळ्या आहेत. मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान 4 चोरट्यांनी येऊन, या दोन्ही बापलेकीला मारहाण करत त्यांचे हातपाय बांधले व त्यांच्याकडील सर्व शेळ्या एका वाहनात घालून चोरून नेल्या.

धक्कादायक ! शेतकऱ्याचे हातपाय बांधुन दरोडेखोरांनी 25 शेळ्या पळवल्या
अमरावतीमध्ये बालविवाह रोखण्यास चाईल्ड लाईनला यश

सदरील घटना घडल्यानंतर, बाजुला राहणार्‍या एका व्यक्तीच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर, त्या व्यक्तीने बीड पोलीसांशी संपर्क साधला. बीड पोलीसांनी याची माहिती धारूर पोलीसांना दिली. त्यानुसार धारूर पोलीसांनी घटनास्थळी जावून या जखमी बापलेकीला रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात धारूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने धारूरमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com