Onion Price : गळ्यात कांद्याच्या माळा घालत 'प्रहार'च्या कार्यकर्त्यांचे चांदवडला बेमुदत उपाेषण सुरु

मागण्या मान्य हाेईपर्यंत आंदाेलन सुरु राहणार
nashik, onion price, chandwad
nashik, onion price, chandwadsaam tv
Published On

- अजय सोनवणे

Onion Price : सध्या कांद्याचे दर (onion Price) घसरत असल्याने सर्वत्र रान उठले आहे. नाशिकच्या (nashik) चांदवड (chandwad) येथे प्रहार संघटनेने (prahar sanghatana) कांदा प्रश्नावर प्रांत कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आहे. (Nashik Latest Marathi News)

nashik, onion price, chandwad
Raju Shetti Tweet: लबाड लांडगं ढाँग करतंय ! दिवसा वीजेच साँग करतंय !! 'सत्तेत आल्यावर त्यांचीही फ्यूज उडाली'

आंदाेलक गळ्यात कांद्याच्या माळा घालत ट्रॅकरमध्ये बसून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रांत कार्यालयावर पोहचले. कांद्याला किमान 500 रुपये क्विंटल अनुदान द्यावे, जो पर्यंत 1200 रुपये भाव मिळत नाही तो पर्यंत अनुदान मिळावे अशी आंदाेलकांनी मागणी केली.

nashik, onion price, chandwad
Onion Price : लासलगावात कांदा लिलावास प्रारंभ, दर वाढला; नगर- मनमाड महामार्गावर 'स्वाभिमानी'चा ठिय्या

तसेच बाजार समित्यांमध्ये अवांतर व नियमबाह्य खर्चावर आळा घालावा, जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सरासरी भावात 300 ते 500 रुपयांचा फरक होतो तो होता कामा नये. या व अन्य विविध मागण्या जो पर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत उपोषणाचे आंदाेलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com