Parbhani News: सोयाबीनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी संकटात

Parbhani News : सोयाबीनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी संकटात
Soybean Crop
Soybean Crop Saam tv

परभणी : सोयाबीन पिकाची लागवड परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे. परंतु सोयाबीन पिकांवर (Soybean Crop) करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पडला असून उत्पन्नात घट होण्याची भीती वर्तविली जात आहे. यामुळे शेतकरी (Farmer) संकटात सापडला आहे. (Live Marathi News)

Soybean Crop
Yavatmal News: आणखी एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले; यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसात ६ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

परभणी जिल्ह्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्यामुळे पिकांचे पाण्याअभावी भरणपोषण व्यवस्थित झाले नाही. रिमझिम पावसाने थोड्याफार प्रमाणात पिके जगली. मात्र, आता त्यावरही विविध रोग, किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने उभे सोयाबीन वाळत आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास जाताना बघून शेतकरी हवालदिल झाला आहे. या करपा रोगामुळे काही झाडांच्या शेंगा गळून पडत आहेत. तर काही जागीच वाळून जात आहे. 

Soybean Crop
Banana Crop: केळीवर सीएमव्हीचा प्रादुर्भाव; साडेसात एकरातील केळीची खोडे फेकली उपटून

पंचनाम्याची मागणी 

कोणतेही कीटकनाशक फवारणी केले तरीही फरक जाणवत नाही. त्यामुळे शेतकरी तूर्तास चिंतेत पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी; अशी मागणी होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com