Soyabean Price : सोयाबीन दरवाढीची प्रतीक्षाच; अतिवृष्टीने सोयाबीन खराब झाल्याचे सांगत व्यापाऱ्यांकडून लूट

Parbhani News : संपूर्ण खरीप हंगामातील विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना केल्यानंतर आता उरले सुरले सोयाबीन काढण्याची शेतकरी लगबग करीत आहेत.
Soyabean Price
Soyabean PriceSaam tv
Published On

परभणी : परभणी जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामातील सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. परंतु, शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला दर अजून मिळत नाही. मुळात मार्केटमध्ये नवीन सोयाबीनची आवक वाढली असून दर मात्र कमी झालेले आहेत. शिवाय अति पावसामुळे सोयाबीनची प्रत खराब झाल्याचे कारण सांगत व्यापारी देखील कमी भाव देत शेतकऱ्यांची लूट करत आहेत. 

मागील काही वर्षांपासून सोयाबीनचा खर्च वाढला असला तरी अपेक्षित दर वाढताना दिसून येत नाही. यामुळे यावेळेस तरी (Soyabean Price) सोयाबीनला अपेक्षित दर मिळेल का? याबाबत शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षाच आहे. संपूर्ण खरीप हंगामातील विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना केल्यानंतर आता उरले सुरले सोयाबीन काढण्याची शेतकरी लगबग करीत आहेत. अति पावसाने सोयाबीनवर मोजॅक रोग व पाण्यात राहिल्याले सडून गेले. ह्याचाच फायदा व्यापारी घेत आहेत. तर शेतकरी (Farmer) जे हाताशी आले ते काढून बाजारात विकत आहेत.  

Soyabean Price
Pimpri Chinchwad Crime : किरकोळ वादातून भयानक कृत्य; छातीवर स्क्रू ड्रायव्हरने वार, रिक्षा चालकाचा मृत्यू

नाफेडची सोयाबीन खरेदी १५ ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे. गतवर्षी सोयाबीनचे दर दहा हजारावर गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या क्षेत्रात यंदा वाढ केली होती. तालुक्यामध्ये खरीप हंगामातील कपाशी व सोयाबीन ही प्रमुख पिके मानली जातात. त्यात हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी सोयाबीन पिकाची लागवड करतात. मात्र, मागील काही वर्षांपासून सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. सोयाबीन पेरणीपासून या पिकाला लागणारा खर्च आणि त्या तुलनेत अत्यल्प मिळत असलेले दर, यात शेतकरी मोठा भरडला जात आहे. सध्या बाजारात सोयाबीनला अवघा ४ हजार २०० ते ३०० रुपये दर मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com