Urea Black Market : पालघरमध्ये युरियाचा पुन्हा काळाबाजार; कारखान्यांसाठी नेला जात असताना पकडला ट्रक

Palghar News : शेतीत पिकांची वाढ होण्यासाठी प्रामुख्याने युरियाचा वापर केला जात असतो याचा वापर अन्यत्र करून काळाबाजार केला जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले बऱ्याचदा युरिया शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही
Urea Black Market
Urea Black MarketSaam tv
Published On

पालघर : शेतीसाठी वापरण्यात येत असलेल्या युरिया खताचा काळाबाजार होत असल्याचे वारंवार समोर येत असते. अशाच प्रकारे पालघरमध्ये होत असलेला काळाबाजार पुन्हा एकदा उजेडात आला आहे. शेतीसाठी वापरला जाणारा युरिया हा कारखान्याच्या कामासाठी नेला जात असताना पोलिसांनी पकडले आहे. युरियाचा संपूर्ण ट्रक बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 

शेतीत पिकांची वाढ होण्यासाठी प्रामुख्याने युरियाचा वापर केला जात असतो. मात्र याचा वापर अन्यत्र करून काळाबाजार केला जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. परिणामी बऱ्याचदा युरिया शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकत नाही. मिळाला तरी जादा दराने युरिया खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असते. कृषी विभागाकडून देखील यावर अंकुश बसविता आलेला नाही. अशातच पालघरमध्ये काळाबाजारत जात असलेला युरिया जप्त करण्यात आला आहे. 

Urea Black Market
Shirdi Sai Baba : शिर्डीच्या साईचरणी सोन्याचा मुकुट, पंढरीच्या विठुरायाचरणी सोन्याचा हार

५० लाखांचा युरिया जप्त 

शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या युरिया खताचा पालघरमध्ये राजरोसपणे सुरू असलेला काळाबाजार पुन्हा एकदा उघड झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी असलेला युरिया खत खुलेआम काळ्या बाजारातून कारखान्यांसाठी नेला जात होता. हा लाखो रुपयांचा युरिया खत बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी टेम्पोमध्ये जवळपास ५० लाखांपेक्षाही अधिक किमतीचा युरिया खत जप्त करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. 

Urea Black Market
Ulhasnagar Hospital : उल्हासनगरचे शासकीय मध्यवर्ती रुग्णालय अंधारात; वीज पुरवठ्याअभावी ऑपरेशन्स सुद्धा रखडले

तपासणीसाठी पाठविले खताचे नमुने 

बोईसर- तारापूर एमआयडीसीमध्ये सर्रासपणे शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या युरिया खताचा काळाबाजार होत असताना कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. बोईसर येथे पकडण्यात आलेल्या युरिया खताचे नमुने सध्या तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com