अजय सोनवणे
नाशिक : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्री केली. बाजार समितीकडून विक्रीची रक्कम तात्काळ देण्यात आलेली नव्हती. चार महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून आज पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरच आंदोलन सुरु केले आहे.
गेल्या चार महिन्यांपूर्वी २९४ हून अधिक शेतकऱ्यांनी तीन कोटी रुपयांच्या जवळपास पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो विक्री केला होता. चार महिने उलटून गेल्यानंतरही व्यापाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तर दिली जात आहेत. तसेच याबाबत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही कुठली दखल घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून आंदोलन छेडले आहे.
कांदा लिलाव पाडला बंद
संतप्त झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी आज पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी येत कांद्याचे लिलाव बंद पाडले. यानंतर बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू करत ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही; तोपर्यंत कुठलेही लिलाव होऊ देणार नाही, आंदोलन असेच सुरू राहील अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. परिणामी सकाळी बाजार समितीमध्ये होणारा लिलाव बंद होता.
बाजार समितीकडून दखल नाही
यावेळी शेतकऱ्यांनी पैसे आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशी जोरदार घोषणाबाजी करत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू ठेवले आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तातही वाढ झाली आहे. दरम्यान सकाळपासून आंदोलन सुरु असताना देखील बाजार समितीकडून या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी कोणी आले नसल्याने शेतकऱ्यांच्या भावना संतप्त झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.