Amravati Accident : कापूस विक्रीसाठी घेऊन जाताना शेतकऱ्यावर काळाचा घाला; भरधाव वाळू डंपरची वाहनाला धडक

Amravati News : वाळू वाहतूक रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर असताना या वाहतुकीमुळे होणारे अपघात आणि यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. अशीच घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे
Amravati Accident
Amravati AccidentSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: वाळूची अवैध वाहतूक करणारे डंपर जीवावर उठले आहेत. रात्रीच्या अंधारात भरधाव वेगाने डंपर नेले जातात. अशातच अपघात घडत असतात. अशाच प्रकारे कापूस विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाला भरधाव वेगाने आलेल्या डंपरने जोरदार धडक दिली. यात गाडीवरील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडला आहे. 

वाळू घाटांचे लिलाव न झाल्याने अमरावतीत मोठ्या प्रमाणात वाळू तस्करीला उधान आले आहे. वाळू वाहतुकीस बंदी असल्याने रात्रीच्या अंधारात चोरून वाळू वाहतूक केली जात असते. यामुळे डंपर किंवा ट्रॅक्टर भरधाव वेगाने चालविले जात असतात. दरम्यान वाळू वाहतूक रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर असताना या वाहतुकीमुळे होणारे अपघात आणि यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. अशीच घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. 

Amravati Accident
Cotton : अमरावती जिल्ह्यात साडेसात लाख क्विंटल कापूस खरेदी; शेतकऱ्यांना भाव वाढीची प्रतीक्षाच


कापसाने भरलेल्या गाडीला धडक  
भरधाव वेगात वाळू तस्कर रस्त्यावर सुसाट जात असतात. यातच घरात साठवून ठेवलेला कापूस विक्री करण्यासाठी शेतकरी आता जात आहेत. त्यानुसार गाडीत कापूस भरून विक्रीसाठी रात्री शेतकरी निघाला होता. दर्यापूर खोलापूर रस्त्यावरून जात असताना रात्री समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या डंपरने कापसाने भरलेल्या गाडीला जोरदार धडक दिली. यामध्ये गाडीवर बसलेल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे. 

Amravati Accident
Rahuri News : पिकांना पाणी भरायला गेले ते परतलेच नाही; शेतात गेले असता शेतकरी कुटुंब हादरले, परिसरात भीतीचे वातावरण

वाळू तस्करी रोखण्याची मागणी 
दरम्यान रात्री झालेला हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात दोन्ही गाड्या रस्त्याच्या बाजूला उलटल्या आहेत. दरम्यान या अपघातामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविषयी रोष व्यक्त केला आहे. रात्री अशा प्रकारे वाळू वाहतूक सुरु असताना अवैध वाळू तस्करी प्रशासनाच्या डोळ्यादेखत सुरू असल्याने या तस्करीला आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com