Jwari Price: आवक घटल्याने ज्वारीच्या दारात वाढ; हंगाम संपण्यावर आल्याने आवक घटली

Jowar Price News: वातावरण बदल तसेच मध्यंतरी पडलेला अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी बाजार समितीत ज्वारी व दादरची आवक फार कमी झाली आहे
Jwari Price: आवक घटल्याने ज्वारीच्या दारात वाढ; हंगाम संपण्यावर आल्याने आवक घटली
Jowar PriceSaam TV

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आतापर्यंत ज्वारीची आवक चांगल्या प्रमाणात होत होती. मात्र सध्या ज्वारीची आवक कमी झाली आहे. यामुळे भाव थोड्या प्रमाणात वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे सध्या बाजार समितीत ज्वारी विक्रीसाठी आणत असलेल्या शेतकऱ्यांचा थोड्या प्रमाणात फायदा होत आहे. 

Jwari Price: आवक घटल्याने ज्वारीच्या दारात वाढ; हंगाम संपण्यावर आल्याने आवक घटली
Asangaon Railway Station : लोकलची वाट पाहणाऱ्या नर्सचा विनयभंग; आसनगाव रेल्वे स्थानकावरील प्रकार, तरुण पोलिसांच्या ताब्यात

वातावरण बदल तसेच मध्यंतरी पडलेला अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी बाजार समितीत ज्वारी व दादरची आवक फार कमी झाली आहे. या वर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत जवळपास ज्वारी व दादर मिळून २५ हजार क्विंटल एवढी आवक बाजार समिती झाली. जवळपास २ हजार ते २ हजार ८०० रुपये एवढा भाव ज्वारी व दादरला मिळाला होता. या वर्षाच्या तुलनेत मागील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत ६० हजार क्विंटलची आवक (Nandurbar) ज्वारी व दादरची बाजार समिती झाली होती. तर भाव २ हजार ५०० ते २ हजार ६०० एवढा होता.

Jwari Price: आवक घटल्याने ज्वारीच्या दारात वाढ; हंगाम संपण्यावर आल्याने आवक घटली
Nagpur News : रेल्वेतून गांजाची तस्करी; १५ लाखाच्या गांजासह तिघे ताब्यात

यावर्षी पाण्याचा प्रादुर्भावामुळे (Jowar) ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने यंदा आवक कमी झाली आहे. आता हंगाम शेवटच्या टप्प्यात असल्याने आता रोज १०० ते १५० क्विंटल एवढीच आवक बाजार समितीत होत आहे. मात्र आवक कमी झाल्याने भाव वाढण्याची कोणती शक्यता नसल्याने भाव स्थिर राहतील; असे बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे. भावात काहीच फरक पडणार नाही व आवक देखील आता वाढणार नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com