Nagpur Railway Station: रेल्वेतून गांजाची तस्करी; १५ लाखाच्या गांजासह तिघे ताब्यात

Nagpur Railway Station News: नागपूर रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक एकवर उभे असलेल्या दोन जणांच्या हालचालीवर पोलिसांना संशय आला. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाकडून दोघांजवळ असलेल्या बॅगा तपासण्यात आल्या.
Nagpur Nagpur Railway Station: रेल्वेतून गांजाची तस्करी; १५ लाखाच्या गांजासह तिघे ताब्यात
Nagpur Police StationSaam TV

पराग ढोबळे 
नागपूर
: रेल्वे प्रवासादरम्यान अंमली पदार्थांची वाहतूक करण्यास मनाई असताना गांजाची तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. नागपूर लोहमार्ग पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या तिघांकडून १५ लाख रुपयांचा १०८ किलो गांजा जप्त करत तिघांना ताब्यात घेतले आहे. .

Nagpur Nagpur Railway Station: रेल्वेतून गांजाची तस्करी; १५ लाखाच्या गांजासह तिघे ताब्यात
Asangaon Railway Station : लोकलची वाट पाहणाऱ्या नर्सचा विनयभंग; आसनगाव रेल्वे स्थानकावरील प्रकार, तरुण पोलिसांच्या ताब्यात

उत्तर प्रदेशातील रहिवाशी असलेले योगेश प्रसाद, राजेश यादव आणि शिव दुबे या तिघांना लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Nagpur) नागपूर रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक एकवर उभे असलेल्या दोन जणांच्या हालचालीवर पोलिसांना संशय आला. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाकडून दोघांजवळ असलेल्या बॅगा तपासण्यात आल्या. तसेच श्वान पथकाकडून खात्री पटल्याने त्या उघडण्यात आल्या. त्यावेळी ११ बॅगामधून १०८ किलो गांजा मिळून आला. सापडून आलेला गांजा हा १५ लाखाचा आहे. 

Nagpur Nagpur Railway Station: रेल्वेतून गांजाची तस्करी; १५ लाखाच्या गांजासह तिघे ताब्यात
Sambhajinagar Corporation : धोकादायक होर्डिंग उभेच; २४ तासांचा अल्टिमेटम संपला तरीही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

दोन जण फरार 
लोहमार्ग पोलिसांनी (Railway Police) पंचनामा करत त्यांच्याकडून १०८ किलो गांजा जप्त करत तिघांना अटक केली. तसेच सात दिवशी रेल्वे पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. तेच आणखी दोन साथीदार फरार झाल्याची माहिती आहे. यामध्ये हा गांजा कुठून विकत आणला आणि कुठे नेला जाणार होता. कोणाला विकला जाणार या सगळ्याचा तपास लोहमार्ग पोलीस करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com