सागर निकवाडे
नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात कापसू खरेदीला सुरुवात झाली आहे. परंतु कापूस खरेदी करताना व्यापारी जास्त नफा पाहत असतात. व्यापाऱ्यांच्या नफेखोरीमुळे (Farmer) शेतकऱ्याला कापसाला भाव मिळत नसल्याचे चित्र (Shahada) शहादा बाजार समितीत पाहावयास मिळत आहे. (Latest Marathi News)
नंदुरबार जिल्यातील शहादा बाजार समितीच्यावतीने कापूस (Cotton Price) खरेदी करण्यात येत आहे. बाजार समितीचा कापूस खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांच्या प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. स्थानिक व्यापारी हे ४०० ते ५०० रुपये कमी दराने कापसाची खरेदी करत असून शेतकऱ्यांना आर्थिक पिडवणूक करत असल्याचे चित्र आहे. शेतकरी आपला कापूस विक्री करत आहे. मात्र अपेक्षित भाव मिळत नाही.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पाच दिवसात दर कमी
गेल्या ५ दिवसांपासून कापसाला ६ हजार ८२५ ते ७ हजार ७०० या भावाने कापूस खरेदी करण्यासाठी येत होता. मात्र आजपासून ६ हजार ८२५ ते ७ हजार २५० इतका कमी भाव कापसाला मिळत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. यामुळे शेतकरी आता चांगलाच संकटात सापडला असून नफेखोरी करण्याऱ्या व्यापाऱ्यांवर कार्यवाही करणाची मागणी शेतकरी करू लागले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.