Banana Crop: केळीवर सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भाव; शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान

Nandurbar News : केळीवर सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भाव; शेतात जनावरे सोडण्याची वेळ, शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान
Banana Crop
Banana CropSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : केळी पिकावर सध्या सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव पाहण्यास मिळत आहे. दरम्यान शहादा (Shahada) तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जात असते. मात्र, ब्राह्मणपुरी येथील शेतकऱ्यांचा अडीच एकर क्षेत्रावरील केळी पिकांवर (Banana Crop) सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने केळीच्या बागमध्ये जनावरे चारण्यासाठी सोडण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला असून, नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यानी केली आहे. (Tajya Batmya)

Banana Crop
Narendra Modi Shirdi Visit : मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्ते आक्रमक, PM नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर बहिष्कार; काळ्या फिती लावून निषेध

नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुका हा केळी उत्पादक शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यानी आपल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केळी रोपांची लागवड केली आहे. ब्राहाणपुरी येथील शेतकरी नरसई सखाराम पाटील यांनी देखील आपल्या अडीच एकर क्षेत्रात लागवडीसाठी नाशिक येथील एका कंपनीतून सुमारे तीन हजार दोनशे केळीच्या रोपांची लागवड केली आहे. परंतु यावर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पीक उपटून फेकावे लागत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Banana Crop
Beed News : पुढील वर्षी जुन महिन्यातच भरपुर पाऊस; बिरोबाच्या यात्रेत होईकची भविष्यवाणी

शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान 

प्रतिरोप १४ रुपये किमतीची मागवली होती. ही रोपे जुलै महिन्यात लागवड करण्यात आली होती. लागवड करून तीन महिने रासायनिक खताबरोबर निदणी आदी खंर्च केला. परंतु अडीच एकर क्षेत्रावरील केळी पिकांवर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विविध उपाययोजना करून देखील केळीच्या बागा काढण्याशिवाय दुसरा पर्याय नसून ब्राह्मणपुरी येथील शेतकरी नरसई सखाराम पाटील यांनी आपल्या अडीच एकर क्षेत्रावरील केळांच्या बागेवर जनावरे सोडून रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com