Narendra Modi Shirdi Visit : मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्ते आक्रमक, PM नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर बहिष्कार; काळ्या फिती लावून निषेध

Narendra Modi in Shirdi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा केला बहिष्कार; काळ्याफीत लावून निषेध
Maratha Reservation
Maratha ReservationSaam tv
Published On

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहेत. राज्यातील अनेक गावांमध्ये (Maratha Aarkshan) राजकीय पुढारी व नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. मोदींच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकत काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. (Latest Marathi News)

Maratha Reservation
Ravikant Tupkar News : मंत्र्यांना विमा कंपन्यांकडून पैसे जातात; रवीकांत तुपकरांचा माेदी सरकारवर गंभीर आराेप

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा इतका जोरदारपणे तापला असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे येत आहेत. त्यांच्या शिर्डी दौऱ्याच्या निमित्ताने नाशिकच्या येवला तालुक्यातील धुळगाव येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणामध्ये काळ्याफिती लावून त्यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. गो बॅक..गो बॅक; मोदी गो बॅक अशा घोषणा देखील देण्यात आल्या. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा जोपर्यंत मार्गी लावत नाही. तोपर्यंत कुठलाही राजकीय नेता पुढारी अथवा संविधानिक पदावर असलेले मंत्री यांना राज्यात बंदी केली आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध व्यक्त केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation
Durga Devi Visarjan: तलावात बुडून २३ वर्षीय युवकाचा मृत्यू; दुर्गादेवी विसर्जनादरम्यान घटना

केंद्रीय मंत्र्यांनाही फिरू देणार नाही 

संपूर्ण ग्रामस्थांनी आपल्या हाताला काळ्या फिती लावून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच येणाऱ्या काळात लवकरात लवकर आरक्षण न दिल्यास केंद्राचा कुठलाही मंत्री राज्यात फिरू देणार नाही; असा इशारा देखील आंदोलनाच्या ठिकाणी असलेल्या सकल मराठा समाजाच्यावतीने बोलताना देण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com